कोल्हापूर : 'कोल्हापूर उत्तर' विभानसभा पोटनिवडणुकीवरुन मागच्या काही काळात स्थानिक पातळीवर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये बरेच वितुष्ट आले होते. या मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे इथून लढण्यासाठी इच्छूक होते. हा शिवसेनेचे पारंपारिक आणि हक्काचा मतदारसंघ आहे, त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा यासाठी ते आग्रही होते. मात्र पक्षाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहुन त्यांनी दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण वरिष्ठ पातळीवरुन सूत्र हालली आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडेच कायम राहिला. तेव्हापासून राजेश क्षीरसागर कमालीचे नाराज होते.
मात्र २०२४ मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडेच येईल असे आश्वासन आज नाराज क्षीरसागर यांना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे जाहिररित्या आश्वासन दिले. 'कोल्हापूर उत्तर' विभानसभा पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या दरम्यान आज महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन प्रचारसभा घेतली. यात ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, "अरे ठिक आहे, गेल्यावेळी काँग्रेस जिंकली, यावेळी काँग्रेस जिंकेलं. पण युती आणि आघाडी म्हटल्यानंतर पुढे एकत्र जाताना काही घडामोडी घडतात. त्यामुळे पुढे जे काही करायचे आहे ते करायला आपण आहोत ना. बघु कोणमध्ये येते."
२०१९ मध्ये भाजप-काँग्रेसची छुपी युती
या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपवर जोरदार टीका केली. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमध्ये भाजप आणि काँग्रेसची छुपी युती झाली असल्याचा आरोप केला. यासाठी त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमधील आकडेवारीचा आधार घेतला. ठाकरे म्हणाले, मी दोन निवडणुकीचे आकडे सांगतो. २०१४ साली शिवसेनेला मिळाली ६९ हजार ७३६ मत. भाजपला ४० हजार १०४ मत आणि काँग्रेसला मिळाली ४७ हजार ३१५ मत होती. मग २०१९ ला आपली युती झाली. तेव्हा आपल्याला भाजपच्या ४० हजार मतांपैकी सगळीच्या सगळी नाही, पण किमान ३५ हजार, ३०, २५, २० हजार तरी मत मिळालयला हवी होती.
पण त्यावेळी शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांना ७५ हजार एकूण मत मिळली. म्हणजे जेमतेम ५ ते ६ हजार मत वाढली. मग युती मधील ही भाजपची ४० हजार मत कुठे गेली. का पंचगंगेच्या दुषित पाण्यासारखी तुमच्या मतांमध्येही प्रदुषण झालं का? काँग्रेसची मत ४७ हजार होती ती ९१ हजार झाली. मग ४० हजार मत तुम्ही फिरवली नाहीत हे कशावरुन? असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे शिवसेना जे करते ते समोरुन करते. पाठीत वार करायची आमची औलाद नाही. होय तर होय आणि नाही तर नाही. आम्ही देशाच्या, राज्याच्या आणि कोल्हापुरच्या हितासाठी जे काही आहे ते उघडपणे करतो. पाठिंबा देतो तो उघडपणे देतो. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. आताही जयश्री जाधव यांना उघडपणे पाठिंबा आहे. त्यामुळे त्या निवडून येणारचं, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.