Bhosale Group For Voting
Bhosale Group For Voting sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

फडणवीस, पाटलांशी बोलूनच डॉ. भोसले गटाने केले मतदान...

सरकारनामा ब्युरो

कराड : पक्षीय पातळीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी विचार विनिमय करून आम्ही कोणाला मतदान करायचे हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या सहकार्यातून काय निष्पन्न होतंय हे लवकरच समजेल, असे स्पष्टीकरण डॉ. अतुल भोसले यांनी केले आहे. कराड सोसायटी मतदारसंघातील केंद्रावर मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. कराड सोसायटी गटातून राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर रिंगणात आहेत. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. कराड तालुक्यातील कोणता गट कोणत्या उमेदवाराला सहकार्य करणार यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. दरम्यान, आज भोसले गटाचे डॉ. सुरेश भोसले, भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले हे मतदान करण्यासाठी केंद्रावर आले होते. त्यावेळी ते सहकार मंत्र्यांच्या पेंडॉलमध्येच बसल्याने ते सहकार मंत्र्यांसोबतच असल्याचे स्पष्ट झाले.

मतदानानंतर बोलताना अतुल भोसले म्हणाले, सातारा जिल्हा बँकेसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत सहकारमंत्री स्वतः उमेदवार आहेत. त्यामुळे खूप जबाबदारीने मतदान करणे गरजेचे होते. पक्षिय पातळीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय झालेला आहे. त्यामुळे आम्ही केलेले सहकार्यातून काय निष्पन्न होतंय हे लवकरच समजेल, अशी गुगली त्यांनी टाकली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT