Rajesh Kshirsagar, Jitendra Awhad  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jitendra Awhad Controversy : कोल्हापुरातून आव्हाडांवर जहरी टीका, संतापलेल्या क्षीरसागरांनी दिला इशारा...

Rahul Gadkar

Jitendra Awhad Controversy : जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या जहालवादी वक्तव्याचं आश्चर्य वाटतं. त्यांना मुंब्रा येथील जहालवादी मुस्लिमांचे बोल बोलावे लागतात. मुंबईतील जहालवादी मुस्लिमांनी मटण खाऊन टाकलेले तुकडे आव्हाड खात असतील, अशी टीका करत प्रभू श्रीराम हे अखंड हिंदुस्तानचे दैवत आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही.

असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी दिला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून शिंदे गटाचे आमदार होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार विधानसभेत पाठवणार आहे. कार्यकर्ता या नात्याने मला जनतेचे पाठबळ आहे.

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वरिष्ठ नेतृत्व जो आदेश देईल तो पाळणार, जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे आम्ही ठाम राहणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले. महानंद प्रकरणावरून बोलताना क्षीरसागर यांनी संजय राऊत यांना आरोप करण्यापलीकडे दुसरे काही येत नाही. मराठी माणसाची माथी भडकवायच्या पलीकडे त्या चांडाळ चौकडीचे काही काम नाही.

भगवानभरोसे पक्ष कधी वाढत नाही, हे संजय राऊत यांनी ध्यानात ठेवावे. लोकांची दिशाभूल करतात त्यामुळेच ते सध्या या ठिकाणी आहेत. असा टोला लगावत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्रावर कोणताही अन्याय होऊ देणार नाहीत, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावरून बोलताना क्षीरसागर यांनी, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम शिंदे गट करणार आहे. जानेवारी शेवटच्या आठवड्यात 27 जानेवारीला कोल्हापुरात शिंदे गटाचे राष्ट्रीय कार्यकारिणी शिबिर होणार आहे. उद्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यभर दौरा होणार आहे. 28 दिवस हा दौरा होणार असून शेवटचे दोन दिवस कोल्हापुरात दि. 27 व 28 रोजी सभा होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

पहिल्यापासून आमची भूमिका हीच आहे की आमच्यावर अन्याय होतोय. आम्हाला आमचं मत सुद्धा व्यक्त करता येत नाही. मुरलीधर जाधव यांना कळाले आहे. बाकीच्यानाही लवकरच कळेल, लोकांचं मत आम्हाला विधानसभेत मांडता येत नव्हतं, इतका दबाव आमच्यावर होता. मुरलीधर जाधव यांचे मत म्हणजे जनतेचे मत आहे. आपल्या लोकांची किंमत ठेवायची नाही.

आपल्या लोकांचं ऐकायचं नाही. आपल्याच पक्षाचा वापर इतर पक्षाला कसा होईल ? यासाठी प्रयत्न करायचे त्यामुळेच शिवसेनेत झालेली ही पडझड आहे. दरम्यान, मुरलीधर जाधव शिंदे गटात येणार असतील तर त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर प्रतिक्रिया देताना क्षीरसागर यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT