Ncp News : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर; नवे वेळापत्रक जाहीर करणार

Political News : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत बरी नसल्याने आजपासून सुरू होणार असलेली सुनावणी रद्द करण्यात आली.
Ajit Pawar, shard pawar, Rahul narvekar
Ajit Pawar, shard pawar, Rahul narvekar Sarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची गुरुवारपासून (ता. ४) विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर सुनावणी होणार होती. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत बरी नसल्याने आजपासून सुरू होणार असलेली सुनावणी रद्द करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आजच सुनावणीचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी पक्षातील आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे एक वेळापत्रक गुरुवारी जाहीर होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. 31 जानेवारीपर्यंत निर्णय द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, ही सुनावणी लवकरात लवकर घेऊन त्याचा निकाल विधानसभाध्यक्षांना द्यायचा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, shard pawar, Rahul narvekar
Satara loksabha News : मुख्यमंत्र्यांचा पुरुषोत्तम जाधवांना ग्रीन सिग्नल; म्हणाले, सातारा लोकसभा लढूया..!

सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार (Ajit pawar) यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार, खासदारांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. जशी परिस्थिती शिवसेनेत झाली, तीच परिस्थिती राष्ट्रवादीत निर्माण झाली. ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्याविरोधात कोर्टात अपात्रतेची याचिका दाखल केली गेली आहे.

राष्ट्रवादीमधून बाहेर पडल्यावर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायलयात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. लवकरात लवकर सुनावणी घेऊन निकाल द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. गुरुवारी एक वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे, ज्यानुसार राष्ट्रवादीची सुनावणी केव्हा आणि कशी पार पडेल, याचे वेळापत्रक ठरवले जाणार आहे.

दरम्यान, याबाबत मीडियाशी बोलताना राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी मोठे विधान केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय वेळेत घेणार असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले होते.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारीपूर्वी

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधी राष्ट्रवादी अपात्र आमदारांची सुनावणी होणार आहे. शिवसेना आमदारांची सुनावणी पूर्ण झाली आहे. 10 जानेवारीपूर्वी शिवसेना आमदार प्रकरणाचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या गुरुवारपासून अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. येत्या काळात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीनंतर 10 जानेवारीला निकाल लागण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या निकालावर राष्ट्रवादीच्या आमदारांचे भवितव्य अवलंबून

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्या आहेत आणि आता केवळ निकाल द्यायचे बाकी आहे. जो निकाल शिवसेनेच्या आमदारांबाबत लागेल तोच निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनादेखील लागू होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांच्या निकालावर राष्ट्रवादीच्या आमदारांचे भवितव्य अवलंबून असणार, असे दिसत आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Ajit Pawar, shard pawar, Rahul narvekar
Satara NCP News : जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर वळसे-पाटलांनी बोलणं टाळलं...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com