Kolhapur politics|  Eknath Shinde news
Kolhapur politics| Eknath Shinde news  
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरातही शिवसेनेला फुटीचे ग्रहण? दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : राज्यातील ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारला राज्यभरातून मिळणाऱ्या पाठिंब्याचा ओघ वाढत चालल्याचे दिसत आहे. तर गेल्या काही दिवसात शिवसेनेला (Shivsena) फुटीचे ग्रहण लागले आहे. आमदारांनंतर आता खासदारही शिंदे गटाला वाटेवर आहेत.गेल्या काही दिवसात मुंबई, कोकणात शिवसेना फुटल्यानंतर आता कोल्हापूरमध्येही शिवसेना फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापूर दौरा केल्यापासून शिवसेनेसाठीही वादळी ठरला आहे. कोल्हापुरातल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात विनायक राऊतांनी शुक्रवारी (१५ जुलै) जी फटकेबाजी केली होती त्या फटकेबाजीच त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. विनायक राऊतांच्या टीकेनंतर आता कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

विनायक राऊत यांनी कोल्हापूरच्या मेळाव्यात राजेश क्षीरसागर यांच्यावर सडकून टिका केली होती. ही टीका क्षीरसागरांच्या जिव्हारी लागली. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटात जाणार असल्याचा इशारा राऊतांना दिला होता. याचा परिणामही दिसून येऊ लागले.

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे दोघेही विनायक राऊतांच्या कार्यक्रमात उपस्थित नव्हते. संजय मंडलिक हे दिल्लीला असल्याची माहिती होती. तर धैर्यशील माने हे आजारी असल्याचे सांगण्यात आले होते. या दोन्ही आमदारांनी अद्याप आपली कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा सध्या कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिंदे गटाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राज्यभरातून शेकडो शिवसैनिकांनी हे शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबईमधील अनेक महापालिकांच्या नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गटात आधीपासूनच 40 पेक्षा जास्त आमदा आहेत. शिंदे गटावर टीका करणारे आमदार त्यांच्या गटात सहभागी होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेला लागलेली गळती भरुन काढण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT