Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama

`मविप्र`चे सभासद विद्यमान कार्यकारिणीच्याच पाठीशी!

मविप्र संस्थेच्या नूतन इमारत उदघाटनप्रसंगी आमदार नरहरी झिरवाळ यांनी संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले.
Published on

लखमापूर : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या (MVP) दिंडोरी (Dindori) महाविद्यालयाची नवी इमारत म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पर्वणीच आहे. ‘मविप्र’ संस्थेने ज्ञानाची गंगा खेडोपाडी पोचवली. areaसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केले. (Maratha vidya prasarak institute spread education in every village of rural)

Narhari Zirwal
दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंपुढे अन्नाची शपथ घेतली, अन् गद्दारी केली..

मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी येथील इमारतीचे उदघाटन आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस नीलिमाताई पवार उपस्थित होते.

Narhari Zirwal
निसर्गाने भरभरून पाऊस दिला...व्यवस्था मात्र कर्मदरिद्री...

यावेळी झिरवाळ म्हणाले, की मविप्र संस्थेच्या विकासासाठी यापूर्वी देखील सहकार्य केले असून, यापुढेही मदत करत राहील. कार्यकारिणीने संस्थेचा विस्तार जिल्ह्यात केला आहे. पदाधिकाऱ्यांचे कामकाज उत्कृष्ट असल्याने पुढील काळातही सभासद पाठिंबा त्यांना देतील.

सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी संस्थेने शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसूत्रीवर आधारित कामकाज केले असून, कार्यकारी मंडळ व सभासदांच्या सहकार्याने चांगले कामकाज केले असून सभासदांच्या हितासाठी आरोग्य विमा देण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी सभापती माणिकराव बोरस्ते यांनी संस्थेने केलेल्या कामकाजाची माहिती दिली.

यावेळी श्रीराम शेटे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. तुषार शेवाळे यांनी उत्तर महाराष्ट्रात मविप्र संस्थेने आपल्या कामाचा ठसा उमटविला असून यासाठी लोकप्रतिनिधी, सभासद, हितचिंतक, यासह सर्वांचे योगदान मिळाल्याते सांगितले.

माजी विद्यार्थी तुषार वाघ यांनाही मनोगत व्यक्त केले. माजी प्राचार्य डॉ. भवरे, डॉ. वेदश्री ठिगळे, वणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, माजी शिक्षणाधिकारी आर. एल. पाटील आदींचा सत्कार झाला.

यावेळी संस्थेचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील, `कादवा` सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी बस्ते, संस्थेचे संचालक भाऊसाहेब खातळे, उत्तम भालेराव, दत्तात्रय पाटील, नानासाहेब महाले, प्रल्हाद गडाख, हेमंत वाजे, डॉ. विश्राम निकम, सचिन पिंगळे, सेवक संचालक नानासाहेब दाते उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com