Solapur ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur ZP : बदली झाली अन्‌ कपाटाची चावीही सोबत नेली; नव्या अधिकाऱ्याला कामच करता येईना!

PWD News : सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी बदलीनंतर कपाटाची चावी सोबत नेल्याने नवे अधिकारी अ. परवेझ खैरदी यांना महत्त्वाच्या फायलींचे कामकाज अडचणीत आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 13 July (विठ्ठल सुतार) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांची नांदेड येथे नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या जागी अ. परवेझ खैरदी रुजू झाले आहेत. बदलीनंतर कार्यालयाचा पदभार देताना खराडे यांनी कपाटाची चावी खैरदी यांच्याकडे देणे अपेक्षित हेाते. मात्र, खराडे यांनी कपाटाची चावी स्वतःसोबतच नेल्यामुळे नवे अधिकारी खैरदी यांना महत्त्वाच्या फायलींवरील निर्णय घेणे अवघड झाले आहे.

खराडे यांनी पदभार देऊन १५ दिवस झाले, तरी कपाटाची चावी खैरदी यांच्याकडे देण्यात आलेली नाही. त्यामुळे कपाटाचे कुलूप तोडण्याच्या सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, याबाबत कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांच्या कार्यकाळात अनेक वाद निर्माण झाले होते. बांधकाम विभाग क्रमांक २ च्या कार्यकारी अभियंत्यांचे अधिकार वापरणे, परस्पर निविदा काढणे यासह अनेक बाबींवर त्यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. याशिवाय जिल्हा परिषद व परिसरातील सुरक्षा रक्षकांच्या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने ३१ महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या विषयासह अनेक प्रकरणे वादग्रस्त ठरली होती.

अनेक ठेकेदारांच्या बिलांवर वेळेत स्वाक्षऱ्या न करणे, तसेच जाणूनबुजून फायली अडवून ठेवणे, असेही आरोप खराडे यांच्यावर झाले होते. काही महिन्यांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खराडे यांच्या कार्यालयाची तपासणीही केली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही प्रशासकीय कारवाई करण्यात आली नव्हती.

नांदेड येथे बदली झालेल्या कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी कपाटाला कुलूप लावून त्याची चावी सोबत नेल्याचे कर्मचाऱ्यांकडून समजले. कुलूपबंद असलेल्या कपाटात कामकाजाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे व फायली आहेत. त्यांनी स्वतःहून चावी न दिल्यास कुलूप तोडण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT