Dada Bhuse : दादा भुसेंच्या बालेकिल्ल्यात महिलाराज; बाजार समितीच्या 77 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला सभापती, हिरे गटाचा उमेदवार पाडला

Malegaon Market Committee, Meenakshi Deore : हिरे गटाच्या उमेदवाराला केवळ पाच मते पडली. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या समर्थक मीनाक्षी अनिल देवरे या निवडून आल्या.
Advay Hiray & Dada Bhuse
Advay Hiray & Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Malegaon Market Committee Election : मालेगाव येथील बाजार समितीच्या सभापतिपदी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या समर्थक मीनाक्षी अनिल देवरे, तर उपसभापतिपदी रत्नप्रभा प्रवीण पगार यांची निवड झाली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 77 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलेला सभापती होण्याचा मान मिळाला. बाजार समितीत आता महिलाराज राहणार आहे. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती दोघांचे मंत्री दादा भुसे यांनी अभिनंदन केले.

मालेगाव बाजार समितीची स्थापना 1 सप्टेंबर 1949 ला झाली. 77 वर्षांच्या कारकीर्दीत पाच वेळा प्रशासकांनी कामकाज पाहिले. तब्बल 36 वेळा पुरुष सभापती झाले. मीनाक्षी देवरे यांच्या रूपाने प्रथमच महिला सभापती झाल्या आहेत.

दरम्यान, 1949 ते 2025 या कालावधीत 30 पुरुष उपसभापतींनी कामकाज पाहिले. 20 जानेवारी 2025 ला प्रथमच अरुणा सोनजकर प्रथम महिला उपसभापती झाल्या. रत्नप्रभा पगार यांच्या रूपाने सलग दुसऱ्यांदा महिलेला उपसभापतिपदाची संधी मिळाली.

सभापती चंद्रकांत शेवाळे तर उपसभापती अरुणा सोनजकर यांनी आवर्तन पद्धतीमुळे राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. रिक्त झालेल्या या पदांसाठी बाजार समितीच्या सभागृहात उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. १२) दुपारी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

Advay Hiray & Dada Bhuse
Dada Bhuse News: शिक्षणमंत्र्यांनी वाजवली घंटा! सातपुड्याच्या दुर्गम भागात भरली शाळा, आदिवासी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुललं हसू

सभापतिपदासाठी शिवसेनेच्या मीनाक्षी देवरे व अद्वय हिरे गटाचे संदीप पवार यांच्यात थेट लढत झाली. अर्ज छाननीनंतर गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. एकुण 17 सदस्यांनी मतदान केलं. त्यात मीनाक्षी देवरे यांना 12, तर संदीप पवार यांना फक्त 5 मते मिळाली. सभापतिपदी मीनाक्षी देवरे निवडून आल्याचे निवडणूक अधिकारी शेळके यांनी जाहीर केले. दरम्यान, सत्तारूढ गटातील सदस्य मतदान करताना मोबाईलमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढीत असल्याचा आक्षेप संदीप पवार यांनी घेतला.

Advay Hiray & Dada Bhuse
Dada Bhuse : TET पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांनी घेरलं ; भर बैठकीत दादा भुसे म्हणाले, मी स्वतःहून राजीनामा देईल..

उपसभापतिपदासाठी शिवसेनेच्या रत्नप्रभा पगार यांच्यासह भिका कोतकर, चंद्रकांत शेवाळे व हिरे गटाचे रवींद्र सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले होते. व्यापारी गटातून निवडून आलेल्या भिका कोतकर यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आला. चंद्रकांत शेवाळे यांनी माघार घेतली. रत्नप्रभा पगार व रवींद्र सूर्यवंशी यांच्यात लढत झाली. श्रीमती पगार यांना १२, तर श्री सूर्यवंशी यांना 5 मते मिळाली. रत्नप्रभा पगार यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

शेतकी संघाच्या निवडी बिनविरोध

दरम्यान, येथील शेतकरी सहकारी संघाच्या सभापतिपदी शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे समर्थक अनिल निकम, तर उपसभापतिपदी सुभाष गिल यांची बिनविरोध निवड झाली. रविवारी झालेल्या निवड प्रक्रियेत निर्धारित वेळेत सभापतिपदासाठी निकम आणि उपसभापतिपदासाठी गिल यांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

या निवडीमुळे माजी मंत्री प्रशांत हिरे समर्थकांची गेल्या १५ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आली.संघाची निवडणूक २१ जून रोजी झाली होती. त्यात भुसे समर्थकांच्या शेतकरी विकास पॅनलने १५ पैकी १५ जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले होते, तर भाजप नेते अद्वय हिरे समर्थकांच्या जनशक्ती पॅनलचा पराभव झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com