Mahesh Shinde, Shashikant shinde satara reporter
पश्चिम महाराष्ट्र

कार्यक्रम महेश शिंदेंच्या वाढदिवसाचा... घोषणा मात्र शशिकांत शिंदेंच्या नावाची....

Umesh Bambare-Patil

सातारा : कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिनी त्यांची ग्रंथतुला करण्यात आली, यावेळी उत्साही कार्यकर्त्याने घोषणा देताना महेश शिंदे ऐवजी आमदार शशिकांत शिंदेंच्या नावाची घोषणा दिली. यामुळे उपस्थितांत एकच हशा उडाला. चूक लक्षात आल्यावर त्या कार्यकर्त्याने पुन्हा महेश शिंदेंच्या नावाची घोषणा दिली. याची कोरेगाव मतदारसंघात मात्र, मोठी चर्चा रंगली आहे.

कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिनी कोरेगाव मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका कार्यक्रमात आमदार शिंदेंची ग्रंथतुला करण्यात आली. कार्यक्रमात एका उत्साही कार्यकर्त्याने नेहमीप्रमाणे विजयाची घोषणा दिल्या. मात्र महेश शिंदेंऐवजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाची विजयाची घोषणा दिली. त्यामुळे उपस्थितांत हश्श्याचे फवारे उडाले.

महेश शिंदेंनीही या चुकीकडे हसून दूर्लक्ष केले. ही चूक संबंधित कार्यकर्त्याच्या लक्षात येताच त्यांनेही बदल करुन महेश शिंदेंच्या नावाची घोषणा दिली. सध्या कोरेगाव मतदारसंघात महेश शिंदेंचे वर्चस्व वाढलेले असले तरी यापूर्वी शशिकांत शिंदेंनी जावळीतून येऊन कोरेगाव मतदारसंघात आपले एक स्थान निर्माण केले आहे. त्याचा परिणाम महेश शिंदेंच्या कार्यक्रमात दिसून आला जनतेच्या मनात आजही शशिकांत शिंदे यांचे नाव कायम असल्याची प्रचिती आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT