Mahesh Shinde : आमदार महेश शिंदेंना CM शिंदे, DCM फडणवीसांकडून वाढदिवसाची भेट

MLA Mahesh Shinde | महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अनेक प्रकल्प जाणीवपूर्वक ठप्प ठेवले.
Mahesh Shinde, Eknath Shinde
Mahesh Shinde, Eknath Shindesarkarnama

कोरेगाव : कोरेगावचे शिवसेना आणि सध्या शिंदे गटात असलेले आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून वाढदिवसांची मोठी भेट दिली आहे. कोरेगाव, खटाव तालुक्याला वरदान ठरणाऱ्या स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन अर्थात जिहे- कटापुर योजनेच्या उर्वरीत कामाच्या पूर्णत्वासाठी सुमारे ३७० कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य शासनाने मंजूरी दिली असल्याची माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली आहे.

आमदार शिंदे म्हणाले, "जिहे-कठापूर योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन निधी देत जून २०१९ पर्यंत ही योजना ९८ टक्के पूर्णत्वास नेली. मात्र, त्यानंतरच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प जाणीवपूर्वक ठप्प ठेवले. कोरेगाव, खटाव, माण तालुक्यातील ही सिंचन योजना त्यामुळे प्रलंबित राहिली. मात्र आता राज्य शासनाने सिंचन प्रकल्पांसाठी भरभरुन निधी दिला आहे.

Mahesh Shinde, Eknath Shinde
Friendship Day Special : संसदेत पहिल्यांदाच भेटले अन् माने - विखे पाटील घराण्यात मैत्री फुलली...

नवीन सरकार आल्यानंतर अवघ्या एकाच महिन्यात २५ कोटींचा निधी, कॉरिडॉर व सिंचन योजनांना तब्बल ३७० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच रामोसवाडीपासून भाडळे तलावाला जोडणाऱ्या योजनेचेही सर्वेक्षण पूर्ण झाले असून, या कामालासुध्दा स्वतंत्र निधी उपलब्ध केला जाणार आहे. त्यातून येत्या वर्षभरामधे खोऱ्यातील इंच न इंच जमीन ओलिताखाली येणार आहे, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले.

Mahesh Shinde, Eknath Shinde
Friendship Day Special : तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे...' 

जिहे- कठापूरच्या उर्वरीत कामासह जिहे-कठापूरजवळ कृष्णा नदीवर उभारलेल्या बॅरॅकपासून वर्धनगड बोगद्यापर्यंत दुसरी जलवाहिनी टाकण्यासाठी २०५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शिवाय खटाव तालुक्यातील वंचित भागांच्या सिंचनासह राजापूर तलाव पुर्नभरणासाठी ११० कोटी, चिंचणी, ललगुण भागातील सिंचनासाठी ५५ कोटी असा तब्बल ३७० कोटींचा भरघोस निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. हा निधी उपलब्ध झाल्यामुळे खटाव तालुक्यातील उर्वरित गावांच्या सिंचन योजनांना नेर तलावाद्वारे नव्याने उपसा सिंचन करता येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com