Sangli NCP Dispute News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli NCP Dispute News: सांगली महापालिकेत राडा; राष्ट्रवादीच्या दोन गटाच्या नगरसेवकांमध्ये जुंपली

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट भिडल्याने सांगली महापालिकेत काही वेळ गोंधळ झाला.

सरकारनामा ब्यूरो

Sangli News: सांगली महापालिकेच्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांना भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे नगरसेवक थेट महापालिकेच्या महासभेतच एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार घडल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला.

सांगलीतील प्रभाग क्र. 20 मधील विकास कामाच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे नाव अजितदादा गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी घेतले. मात्र, यावर शरद पवार यांच्या गटाच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला.

यानंतर अजितदादांच्या गटाचे नगरसेवक आणि शरद पवार यांच्या गटाचे नगरसेवक एकमेकात भिडले. यावेळी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि मैनुद्दीन बागवान, संगीता हारगे यांच्यात जोरदार वादावादी झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षात अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झालेत. आता पक्षातील पदाधिकारीच आमने-सामने येऊ लागल्याचा प्रकार सांगलीत पाहायला मिळाला. प्रभागातील विकास कामावरून राष्ट्रवादीचे दोन्ही गट सभागृहात संतप्त झाल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला.

मात्र, वाद वाढल्याने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दोन नगरसेवकाचे निलंबन करत त्यांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले. महापौरांनी अजित पवार गटाचे योगेंद्र थोरात आणि शरद पवार यांच्या गटाच्या संगीता हारगे यांचे निलंबन केले. त्यांनतर पुन्हा सभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले असले तरी या वादाची चर्चा राज्यभर झाली.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT