Indapur News: विहीर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत; अजित पवारांची घोषणा

Pune News: विहिरीला रिंग टाकण्याचे काम सुरु असताना मुरूम कोसळून ही दुर्घटना घडली.
Indapur News
Indapur NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: इंदापूरमध्ये विहिरीचे काम सुरु असताना मुरूम कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चारही मजुरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. इंदापूरच्या म्हसोबाची वाडी येथे १ ऑगस्टला विहिरीला रिंग टाकण्याचे काम सुरु असताना मुरूम कोसळून ही दुर्घटना घडली.

चार कामगार यामध्ये अडकले होते, त्यानंतर 'एनडीआरएफ'कडून तब्बल ७० तास शोधकार्य सुरू होते. या मजुरांचे मृतदेह आढळून आल्यानंतर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत 'पाँईट ऑफ इन्फॉर्मेशन'च्या माध्यमातून संबंधित मजुरांच्या कुटुंबियांना मदत मिळण्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधले. तसेच या मजुरांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

Indapur News
BJP MLA Meeting: अधिवेशनाचे सूप वाजताच भाजप 'अॅक्शन मोड'वर; जिल्हाध्यक्षानंतर आता सर्व आमदारांची बैठक

आमदार भरणे यांच्या मागणीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने दखल घेत मुरूम कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चारही मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केली.

इंदापूरच्या या दुर्घटनेत सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी (वय ३०), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३०) आणि मनोज मारूती सावंत (वय ४०) या चार मजुरांचा मृत्यू झाला असून या दुर्देवी घटनेनी हळहळ वक्त करण्यात येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com