Samyukt Kisan Morcha Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News : ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष; संयुक्त किसान मोर्चा विधानभवनाला घेराव घालणार...

Panjabrao Patil : कराडच्या प्रीतिसंगमावर आक्रोश घेराव मोर्चाला प्रारंभ होईल.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad News : महाराष्ट्र ऊस वाहतूकदार संघटना व संयुक्त किसान मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने ऊस वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना शेतकरी व ऊस वाहतूकदारांच्या प्रलंबित मागण्यांवर मार्ग काढण्याचे निवेदन देण्यात आले होते. मात्र, नेहमीप्रमाणे कुंभकर्णाचे सोंग घेऊन हे सरकार कोणत्याही प्रश्नावर मार्ग काढताना दिसत नाही. त्यामुळे प्रीतिसंगम ते मुंबई विधान भवन असा आक्रोश घेराव मोर्चा येत्या एक ऑगस्टला काढण्यात येणार असल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली.

पंजाबराव पाटील म्हणाले, 31 जुलैला सकाळी आठ वाजता कऱ्हाडच्या Karad प्रीतिसंगमील जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan यांच्या समाधीस्थळी अभिवादन करुन आक्रोश घेराव मोर्चाला प्रारंभ होईल. या मोर्चात राज्यभरातून तीन हजार ट्रॅक्टर्स सहभागी होणार आहेत. त्यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यातील ट्रॅक्टर्स मालकांचा समावेश असेल.

31 जुलैला सायंकाळी सहा वाजता ते मालक ट्रॅक्टर्ससह पुणे येथे एकत्रित येतील. एक ऑगस्टला सकाळी आठ वाजता मोर्चा मुंबईकडे प्रस्थान करेल. मुंबईत पोचल्यानंतर ट्रॅक्टरसह दोन ऑगस्ट रोजी विधानभवनला घेराव घालण्याचे नियोजन झाले आहे.

पावसाचा विचार करता प्रत्येक ट्रॅक्टर मालकाने आपल्या सोबत ट्रॉली, ताडपत्री, छत्री, बॅटरी व दोन दिवसांची भाकरी बांधून आणण्याची आहे. मुंबईत जास्त दिवस मुक्काम करावा लागल्यास त्या दृष्टीने आपल्यासोबत कपडे आणावी. पोलिसांनी बॅरिकेड्स आडवे लावले तरी बॅरिकेड्स तोडण्याची यंत्रणा सज्ज करून ठेवली आहे.

आपण हा लढा ना भूतो ना भविष्यती असा लढणार आहोत. आपल्या भविष्यातील पिढ्या बरबाद होऊ नये, असे वाटत असेल तर या आक्रोश घेराव मोर्चामध्ये प्रत्येकाने सामील होणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत 2600 ट्रॅक्टरची नोंद झाली आहे. प्रत्येकाने आपल्या ट्रॅक्टरची नोंद आपल्या जिल्हाध्यक्षांकडे करावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT