Shetkari Kamgar Paksha Politics: गणपतरावांच्या नातवांकडून "हम साथ साथ है"चा संदेश

Sangola Politics : सांगोला मतदारसंघातून शेकापची उमेदवारी कोणाला? असा प्रश्न मतदारांना पडला होता.
Shetkari Kamgar Paksha
Shetkari Kamgar Paksha
Published on
Updated on

Sangola Politics : शेतकरी कामगार पक्षाचा गड मानला जाणाऱ्या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतरनंतर डॉ. अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांना थोड्या मताने पराभव स्वीकारावा लागला होता. पण विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अनिकेत देशमुख हे सांगोला मतदारसंघापासून दूर राहिले होते. अनिकेत देशमुख मतदारसंघापासून दूर असताना गणपतराव देशमुख यांचेच दुसरे नातू असलेल्या बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला.

Shetkari Kamgar Paksha
Ahmednagar BJP City President: भाजपने बदलले तीनही जिल्हाध्यक्ष; आगरकर, भालसिंग, लंघे यांची वर्णी!

बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघात संपर्क वाढवल्यानंतर पुढच्या वेळी सांगोला मतदारसंघातून शेकापची उमेदवारी कोणाला? असा प्रश्न मतदारांना पडला होता. यातूनच गणपतराव देशमुख यांच्या घरात विसंवाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये डॉ. बाबासाहेब देशमुख यांना देशमुख परिवारातून उमेदवार कोण असणार, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी बाबासाहेब देशमुख यांनी केडर जो निर्णय घेईल, तो निर्णय मान्य असेल. असं उत्तर दिलं होत. पण या सगळ्यावर गणपतरावांच्या नातवांकडून "हम साथ साथ है"चा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

Shetkari Kamgar Paksha
Vasudev Kale : अजितदादांसारख्या बड्या नेत्यापुढे भाजपला मजबूत करणं वासुदेव काळे यांच्यापुढे आव्हान..

येत्या ३० जुलै रोजी गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगोला तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. त्याच्या आयोजनासाठी नुकतीच सांगोला येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने देशमुख यांच्या नातवांनी आपण एकत्र असल्याचा संदेश तालुक्यातील जनतेला दिला आहे.

याशिवाय याच दिवशी सांगोला कॉलेज परिसरात गणपतराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जात आहे. त्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यासाठी बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख यांनी एकत्रितपणे जाऊन आम्ही एकच आहोत, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com