Gopichand Padalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करत अहल्यादेवींच्या स्मारकाचे उद्घाटन केले : पडळकरांचा दावा

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar memorial) स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून सांगलीत चांगलेच राजकारण रंगले आहे.

सरकारनामा ब्यूरो

सांगली : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar memorial) स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून सांगलीत चांगलेच राजकारण रंगले आहे. भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी स्मारकावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करत उद्घाटन केल्याचा दावा केला.

ड्रोनने स्मारकावर पुष्पवृष्टी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या तरुणांना सोडा अन्यथा आम्ही येथून हटणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे. यातील एकजण ड्रोनचा मालक आहे. झेंडे घेऊन स्मारकाकडे निघालेल्या चार-पाच कार्यकर्त्यांनाही पोलिसानी ताब्यात घेतले, असल्याची माहिती आहे. दरम्यान, पिवळे झेंडे घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी सांगलीमध्ये मोर्चा काढला. स्मारकाकडे जात असताना पोलिसांनी पडळकर आणि खोत यांना अडवले. त्यानंतर पडळकरांनी उद्घाटनाचा आग्रह धरत रस्त्यावर ठिय्या मांडला होता.

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा 2 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते होणार आहे. त्यावर पडळकर यांनी आक्षेप घेत, आज (ता. २७) स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी सांगलीत हजारो कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते. मेढपाळांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले होते. यासाठी त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढली. यानंतर पोलिसांनी त्यांना थांबवले. या पार्श्वभुमिवर पोलिसांनी सांगलीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. राज्य राखीव दलाच्या जवानांच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

पडळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सांगलीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पडळकर म्हणाले, आम्ही आमच्या परंपारिक पद्धतीने इथे आलो. धनगरी नृत्यही सादर करण्यात येणार आहे. आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. हा लोकार्पण सोहळा आमच्या मेढपाळांच्या हस्ते होणार आहे. मात्र, अशा मेंढपाळांना सरकार विरोध करून पद मोठी मने छोटी याचे दर्शन घडवत आहे, अशी बोचरी टीका पडळकर यांनी केला होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT