Rohit Pawar
Rohit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पुणे, पिंपरी-चिंचवडची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मेट्रोचे उद्घाटन

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - पुणे मेट्रो रेल्वेचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या हस्ते करण्यात आले. या मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनावरून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटना संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी टीका केली आहे. ( Inauguration of Metro with Pune, Pimpri-Chinchwad elections in mind )

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार जामखेड येथे लघू उद्योगांच्या मशिनरींचे प्रदर्शन, 151 बचत गटांना कर्ज वितरण व अगरबत्ती मशीन वाटप या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.

रोहित पवार म्हणाले, जेव्हा देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात येतात तेव्हा आपल्या संस्कृतीनुसार त्यांचे स्वागत केले जाते. त्यांच्या स्वागतासाठी महाविकास आघाडीतील काही नेते उपस्थित राहिले असतील. कुठलाही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच एवढ्या मोठ्या व्यक्तीने त्याचे उद्घाटन करावे, अशी भूमिका आमच्यातील काही नेत्यांनी घेतली आहे.

ते पुढे म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्प अर्धवट असला तरी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपमधील स्थानिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावून अर्धवट प्रकल्प असलेल्या मेट्रोत प्रवास घडविला, असा टोलाही त्यांनी लगावला.

मेट्रो जेव्हा आपल्या राज्यात सुरू झाली तेव्हा या प्रकल्पाला मंजुरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळातच मिळाल्या होत्या. मात्र राजकारण करायची आज गरज नाही. पंतप्रधान मोदी आज पुण्यात आले. त्यांचे स्वागत केले. निवडणुका आल्यावर त्या संदर्भातील राजकीय भूमिका आम्हा मांडू, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT