PM मोदींचा पुणे दौरा : मेट्रो प्रवास ते जंगी सभा; भाजपने केली शक्तीप्रदर्शनाची तयारी

PM Narendra Modi | Pune | Municipal Corporation : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून कोणा-कोणाला आणि कोणत्या मुद्द्यांवर लक्ष्य करणार याकडे लक्ष
Murlidhar Mohol - Narendra Modi
Murlidhar Mohol - Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (रविवार) पुणे दौऱ्यावर येत आहेत. महापालिकेची मुदत येत्या १४ मार्चला संपत असून त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपकडून (BJP) जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. त्यांच्या हस्ते निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचा सत्ताधारी भाजपचा मानस आहे.

पंतप्रधान मोदी त्यांच्या हस्ते बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे. तसेच संगमवाडी ते बंडगार्डन हा नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई-बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन अशाही कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

Murlidhar Mohol - Narendra Modi
भाजपचा निवडणूक धमाका : महापालिकेकडून पुणेकरांना २ हजार ५०० कोटींचे गिफ्ट

असा आहे पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा :

पंतप्रधान मोदी यांचे ६ मार्च रोजी सकाळी १०:३० मिनीटांनी लोहगाव विमानतळावर आगमन होईल. तेथून ते COEP मैदानावर हेलिकॉप्टरने येतील. तिथून ते गाडीने महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमाला जाणार आहेत. १० मिनिटांत हा कार्यक्रम संपवून ते मेट्रोच्या उद्घाटनासाठी जंगली महाराज रस्ता, खंडूजी बाबा चौक या मार्गे गरवारे महाविद्यालय मेट्रो स्टेशनवर येणार आहेत. तिथून मेट्रोने ते आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत.

आनंदनगर मेट्रो स्टेशनवरुन मोदी एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर सभेसाठी जाणार आहेत. ही सभा संपल्यानंतर ते गाडीने पौड रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ चौकातून वळून सिंचननगर येथील हेलिपॅडवर जाणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते लवळे येथील कार्यक्रमाला जाणार आहेत. हा कार्यक्रम संपवून दुपारी ३ च्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत. .

Murlidhar Mohol - Narendra Modi
पळण्यासाठी मदत नको, लढण्यासाठी शस्त्रास्त्रे द्या- झेलेन्स्कींनी धुडकावली अमेरिकेची ऑफर

PM मोदींच्या केसालाही धक्का लागू न देण्याचा पुणे पोलिसांचा 'सुरक्षा प्लॅन'

मागच्या काही दिवसांपूर्वी पंजाब दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले होते. त्यावरुन बरेच आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र आता याच घटनेतून धडा घेत पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यातील सुरक्षेसाठी पोलिसांनी संपुर्ण तयारी केली असून झाली असून रविवारी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी १२ डमी कार दिल्लीहून पुण्यात दाखल झाल्या आहेत. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नक्की कोणत्या गाडीमध्ये आहेत हे कळू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. याशिवाय दौऱ्याच्या बंदोबस्तावर राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांचे खास लक्ष असून त्यांच्याकडून बंदोबस्ताचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याकडून बंदोबस्ताचे काम पाहिले जात आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी, ३ पोलिस उपायुक्त, १६ सहाय्यक पोलिस उपायुक्त हे पुणे पोलिसांच्या मदतीसाठी देण्यात आले आहेत. याबरोबरच राज्य राखीव पोलिस दल, फोर्सवनच्या अशा ३ कंपन्या, शहर पोलिस व खास मागविण्यात आलेले पोलिस असा २ हजार २०० पोलिसांचा बंदोबस्त दौऱ्यासाठी नेमण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतूक शाखेनेही पंतप्रधानांच्या रस्ते मार्गावरील प्रवासात कुठलीही अडचण राहू नये, यादृष्टीने नियोजन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com