Abhijit Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीला धक्का देणारे अभिजित पाटलांच्या कारखाना, घर, ऑफिसवर इन्कम टॅक्सचे छापे

उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर प्राप्तीकर विभागाचा छापा पडला आहे.

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांना धक्का देत पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (vitthal Sugar Factory) जिंकणारे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijit Patil) यांच्या कारखान्यावर, पंढरपूरमधील घरावर आणि पतसंस्थेच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने (इन्कम टॅक्स, Income tax) विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. आज पहाटे ही छापेमारी करण्यात आली असून अजूनही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. या छापेमारीमुळे पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Income tax raids on Abhijit Patil's Sugar factory, house, office)

अभिजीत पाटील हे पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचे पंढरपूरमधील कार्यालय, घर आणि पतसंस्थेच्या कार्यालयात इन्कम टॅक्स विभागाची तपासणी सुरू आहे. इतर साखर कारखान्यांमध्ये ही तपासणी सुरू असल्याची माहिती आहे. आभिजित पाटील यांच्याकडे सध्या पाच साखर कारखाने आहेत.

धाराशिव साखर कारखान्यावरही छापा

उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर प्राप्तीकर विभागाचा छापा पडला आहे. आज पहाटेपासून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केल्याची माहिती आहे. पंढरपूर येथील अभिजीत पाटील हे धाराशिव कारखान्याचे चेअरमन असून त्यांच्या इतर मालमत्तांवर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.

अभिजित पाटील यांची ओळख साखर सम्राट निर्माण झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत २१ पैकी २० जागा जिंकल्याने पाटील प्रकाशझोतात आले होते. तसेच त्यांच्या ताब्यात एकूण पाच साखर कारखाने आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT