Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजितदादांनी शब्द खरा करून दाखवला; छत्रपती साखर कारखान्याच्या पॅनेलची घोषणा, जुन्यांना धक्का

Chhatrapati Cooperative Sugar Factory : अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच एका सभेत केलेल्या घोषणेप्रमाणे छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मिलिंद संगई

Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या धडाकेबाज कामांतून महाराष्ट्रभर वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ‘अजितदादा म्हणजे पक्का वादा’, असे समीकरणच तयार झाले आहे. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ते पुन्हा एका सिध्द झाले आहे.

अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच एका सभेत केलेल्या घोषणेप्रमाणे छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय जय भवानी माता पॅनलची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. या पॅनेलमध्ये सर्व नवीन चेहऱ्यांना संधी देत अजितदादांनी जुन्या पदाधिकाऱ्यांना धक्का दिला आहे.

बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे व ज्येष्ठ नेते किरण गुजर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पॅनेलची घोषणा केली. अजितदादांनी केलेल्या घोषणेप्रमाणे पॅनेलमधील नावे निश्चित करण्यात आली आहेत. कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अजितदादा धाडसी निर्णय घेतील, अशी चर्चा पंचक्रोशीत रंगली होती. ती चर्चा खरी ठरली आहे.

जुन्या संचालक मंडळाला डावलत अजितदादांनी नव्या चेहऱ्यांना संधी देत कार्यकर्त्यांमधील नाराजीही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, अजितदादांनी सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांना एकत्रित आणत पॅनेल तयार केला आहे. एकत्रित पॅनेल होणार नाही, अशा चर्चा सभासदांमध्ये होती. पण हे समीकरण जुळवून आणण्यात त्यांना यश आले आहे. या पॅनेलचे नेतृत्व राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याकडे असणार आहे.

असे आहेत जय भवानी माता पॅनलचे उमेदवार

गट 1 लासुर्णे- पृथ्वीराज जाचक व शरद जामदार, गट 2 सणसर - रामचंद्र निंबाळकर व शिवाजी निंबाळकर, गट 3 उद्धट - पृथ्वीराज घोलप व गणपत कदम,  गट 4 अंथुर्णे - विठ्ठल शिंगाडे, प्रशांत दराडे व अजित नरुटे, गट 5 सोनगाव - अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, गट 6 गुणवडी - कैलास गावडे, सतीश देवकाते व निलेश टिळेकर.

ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन - अशोक पाटील, अनुसूचित जाती जमाती - मंथन कांबळे, महिला राखीव प्रतिनिधी - माधुरी राजपुरे व सुचिता सपकाळ, इतर मागास प्रवर्ग - तानाजी शिंदे, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग – डॉ. योगेश पाटील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT