Youth Congress in Shrigonde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

श्रीगोंद्यात युवक काँग्रेसने वाजविला महागाईचा भोंगा

देशातील इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या नेतृत्त्वाखाली श्रीगोंद्यात काल (रविवारी) अनोखे आंदोलन करण्यात आले.

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - राज्यात सध्या भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशातील इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या नेतृत्त्वाखाली श्रीगोंद्यात काल (रविवारी) अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वाढत्या इंधन दरवाढीची माहिती भोंग्यावरून देण्यात आली. ( Inflation horn sounded by Youth Congress in Shrigonda )

श्रीगोंद्यातील पेट्रोल पंपासमोर केंद्रातील भाजपच्या इंधन दरवाढी विरोधात भोंगा आंदोलन झाले. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत आहे. यात सामान्य नागरिकाची पिळवणूक होत आहे. केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे युवक काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. यावेळी दुचाकी वाहनाचे पिंडदानही करण्यात आले.

प्रशांत ओगले म्हणाले की, इंधन दरवाढी विरोधात भोंगे वाजवून जनतेला जागे करण्याचा प्रयत्न श्रीगोंदा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप, मनसेचे काही नेते अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करत आहेत. आज भाजप सरकारला जागे करण्यासाठी संपूर्ण राज्यात भोंगे आंदोलन करण्यात आले. सर्व सामान्य लोकांच्या गरजेच्या वस्तूंची दरवाढ होत आहे. बेरोजगारीचा प्रश्न सुटत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत सिदनकर, तालुकाध्यक्ष संदीप वाघस्कर, शहराध्यक्ष योगेश मेहेत्रे, शुभम लोणकर, नितीन खेडकर, चैतन्य पोटे, सचिन जंजिरे, रोहित राऊत आदी सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT