Ink Attack : भाजपचे नेते, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नुकतीच शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. ही घटना ताजी असतानाच आता सोलापुरातही असाच एक प्रकार घडला. (bjp mla Vijay Deshmukh news update)
सोलापुरात एका कार्यक्रमात भाजप आमदार विजय देशमुख (Vijay Deshmukh) यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापुरात काल (मंगळवारी)रात्री न्यू बुधवार पेठेत बुध्दराष्ट्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आमदार देशमुख आले होते तेव्हा हा प्रकार घडला.
या घटनेमुळे सामूहिक विवाह सोहळ्यात गोंधळ उडाला होता. विजय देशमुख यांच्यावर शाई फेकणाऱ्या लाल पोशाख परिधान केलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
महापुरूषांच्या विरोधात अवमानकारक विधाने करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह सत्ताधारी भाजपाचे जबाबदार मंत्री व इतर नेत्यांवर कारवाई न करता सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत या तरुणाने आमदार देशमुख यांच्या अंगावर काळी फेकली.
महापुरुषांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याबद्दल पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली आहे. तसेच, वाद थांबविण्याचे आवाहन केले आहे. पालकमंत्री पाटील यांच्या वक्तव्यावरून राज्यभर आंदोलने आणि निषेध मोर्चा निघत आहेत. मी आधी स्पष्टीकरण दिले होते. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो, असे निवेदन पालकमंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांना पाठवले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे.
त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यानंतर घडलेल्या घटना क्लेशदायक आहेत. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये, असे मला वाटते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.