Sharad Pawar News : शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदे, चंद्रकांतदादांचे उपटले कान.. !

Sharad Pawar latest news : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याचे कधीही समर्थन करणार नाही, पण..
Sharad Pawar birthday latest news
Sharad Pawar birthday latest newssarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Latest News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल (रविवारी) राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (samruddhi mahamarg) लोकार्पण झाले आहे. (Sharad Pawar Targets Eknath Shinde & Chandrakantdada Patil)

या उद्धघाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात "काही जणांनी या समृद्धी महामार्गाला विरोध केला," असे विधान करीत अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला हाणला होता. या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सडेतोड उत्तर दिले.

शरद पवार यांनी आज ८३ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यंक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भूजबळ, दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे, भालचंद्र मुणगेकर आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी एकनाथ शिंदेच्या विधानाचा समाचार घेतला.

Sharad Pawar birthday latest news
Winter Session Parliament : मोठी बातमी : उमेदवाराची वयोमर्यादा कमी होणार ? ; सहा पक्ष अनुकूल

मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना फोन केला..

शरद पवार म्हणाले, "समृद्धी महामार्गाच्या उद्धघाटन कार्यक्रमात काही जणांनी या मार्गाला विरोध केला असल्याची टीका केली. आम्ही चांगले काम करतो, पण काही जण त्याला विरोध करतात, असा उल्लेख भाषणात करण्यात आला. पण आम्ही कधीही समृध्दी महामार्गाला विरोध केला नाही. एकदा मी औरंगाबादला शेतकऱ्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा काही शेतकऱ्यांनी आमच्या जमीनला योग्य भाव मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना फोन करुन या शेतकऱ्यांच्या जमिनीला रास्त भाव द्या, असे सांगितले होते. या महामार्गाला आमचा विरोध कधीही नव्हता,"

Sharad Pawar birthday latest news
MCD Elections : केजरीवालांच्या दणक्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याचा राजीनामा

'भीक'हा शब्द वापरणे चुकीचे..

महापुरुषांबाबत अवमानकार विधान करणाऱ्या भाजपचे नेते, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही समाचार शरद पवारांनी यावेळी घेतला."चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याचे कधीही समर्थन करणार नाही, पण चंद्रकात पाटलांनी असे विधान केलं नसतं तर असे प्रकार झाले नसते. त्यांनी 'भीक'हा शब्द वापरणे चुकीचे आहे. महात्मा फुले, डाँ. बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाजासाठीचे योगदान मोठे आहे," असे पवार म्हणाले.

त्यांनी 'कमवा आणि शिका असे सांगितले 'भीक मागा' असे नव्हे..

"समाजातील गरीब विद्यार्थ्यांना दोन वेळचं जेवणं मिळण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी दागिने विकले होते. रयत शिक्षण संस्थेत गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल, याचा प्रयत्न केला जातो. गेली ५० वर्ष मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. या संस्थेत कधीही राजकारण आणत नाही. 'कमवा आणि शिका' हे 'रयत'चे ब्रीदवाक्य आहे. कर्मवीरांनी 'कमवा आणि शिका असे सांगितले 'भीक मागा' असे नव्हे," अशा शब्दात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com