सातारा : पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल Ankit Goyal व साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख Samir Shaikh यांना केंद्रीय गृहविभागाचे पदक विशेष पदक जाहीर झाले आहे. त्यांनी गडचिरोलीत राबविलेल्या विशेष ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांचे २०२२ सालाचे विशेष ऑपरेशन पदक अकरा पोलिसांना जाहीर झाले आहे. यामध्ये दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोलीचे तत्कालिन आणि सध्याचे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल आणि साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या विशेष ऑपरेशन पदकात तेलंगाणातील १३, पंजाबमधील १६, दिल्लीतील १९, जम्मू काश्मीर राज्यातील चार तर महाराष्ट्रातील ११ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आयपीएस अंकित गोयल, आयपीएस समीर शेख यांचा समावेश आहे.
तसेच पोलिस निरिक्षक संदीप मंडलिक, सहायक पोलिस निरिक्षक वैभव रणखंब, सुदर्शन काटकर, सहायक फौजदार रतिराम पोरेती, हवालदार रामसे उके, नाईक ललित राऊत, शहागीर शेख, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत बरसागडे, अमरदिप रामटेके या ११ पोलिसांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.