Radhakrishna Vikhe Patil News :
Radhakrishna Vikhe Patil News :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : विखे पाटील यांना जाणीवपूर्वक 'लक्ष्य' केले जातेय का? मतदारसंघात 'गणेश'च्या पराभवानंतर चर्चा सुरू..

मृणालिनी नानिवडेकर.

Ahmednagar News : महाराष्ट्र भाजपमध्ये वरच्या फळीतले नेते ठरलेले राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना मागील काही दिवसांपासून लक्ष्य केले जात आहे, अशी एक चर्चा सुरू आहे. त्यांच्याच मतदारसंघातला गणेश साखर कारखान्यातला पराभव आणि संजय राऊत यांनी केलेला आरोप चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. (Latest Marathi news)

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच विखे पाटील यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप केल्याचे दिसून आले. भाजपचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याच साहाय्याने थोरातांनी विखेंचा पराभव त्यांच्याच मतदारसंघात घडवून आणला. गणेस सहकारी साखर कारखान्यात शिवाजीराव कोते यांच्या पॅनेलला घवघवीत यश मिळाले. ते विखे यांच्यावर मात करून, त्यांना धडा शिकवण्यासाठी होता का? अशी चर्चा आता सुरू आहे.

स्नेहलता कोल्हे यांनी पराभवानंतर विखे पाटील यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार बोलवून दाखवली होती. विखे पाटील यांची संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या यादीत नावाची चर्चा आहे. असे असताना या त्यांच्या या पराभवाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अशातच विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संग्राम कोते यांनी थोरात आणि कोल्हे यांची या निवडणुकीत राजकीय सोबत घडवण्यास पुढाकार घेऊन, स्थानिक राजकारणाचे गणित पालटले. कोते यांच्या या भूमिकेचेही विशेष चर्चा आहे.

संजय राऊतांचा गंभीर आरोप -

एकीकडे कारखान्याचा पराभवाचा धक्का राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाट्याला आले असताना, निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वादग्रस्त मुस्लिम धर्म प्रसारक झाकीर नाईक यांच्या संस्थेने, विखे पाटलांच्यासस्थेत गुंतवणूक केल्याचा गंभीर आरोप केला.

तसेच विधानपरिषदेवरील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) विखे यांच्या महसूल विभागात बदल्यांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप लगावला आहे. मॅटकडून या संस्थांना स्थगिती देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT