Jayant Patil
Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सत्ता जाताच जयंत पाटलांच्या विरोधात कोर्टाचे वारंट

सरकारनामा ब्यूरो

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर पाच वर्षांपूर्वी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात वारंट काढण्यात आले होते. मात्र, जयंत पाटलांनी स्वतः न्यायालयात हजर राहत जामीनाची पूर्तता केली आहे. मात्र, सत्ता जाताच काही दिवसांतच जयंत पाटलांच्या विरोधात वारंट निघाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. (Islampur Court Warrant against Jayant Patil)

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवेळी आमदार जयंत पाटील यांनी शिगाव येथे रस्त्यावरच ठिय्या मारला होता. मुंबई पोलिस अधिनियमानुसार जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात आमदार पाटील यांच्यासह स्वरुपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील, शरद गायकवाड, मोहन गायकवाड, राजेंद्र भासर, विलासराव शिंदे, जितेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

या जमाव बंदीप्रकरणी इस्लामपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने जयंत पाटील यांच्या विरोधात वारंट काढण्यात आले होते. जयंत पाटील हे इस्लामपूर न्यायालयात स्वतः हजर राहिले होते. आमदार जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पूर्तता केली आहे.

दरम्यान, माजी जलसपंदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT