CM Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Air Service : सोलापूरच्या विमानसेवेवरून मुख्यमंत्री आक्रमक : स्टार एअर अन्‌ फ्लाय 91 या कंपन्यांना नोटीस पाठविण्याचे आदेश

CM Devendra Fadnavis Orders : सोलापूर विमानसेवा बंद ठेवल्याप्रकरणी स्टार एअर आणि फ्लाय ९१ ला नोटिसा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाईट लॅंडिंग आणि धावपट्टी विस्ताराची प्रक्रियाही गतीने राबविण्याचे निर्देश दिले.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 04 July (विठ्ठल सुतार) : नाईट लॅंडिंग आणि दृश्यमानतेचे खोटे कारण देऊन सोलापूरची विमानसेवा बंद ठेवणाऱ्या स्टार एअर आणि फ्लाय ९१ या दोन्ही कंपन्यांना नोटिसा देण्यात याव्यात. नाईट लॅंडिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि धावपट्टी वाढविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया प्रशासनाने तातडीने सुरू कराव्यात. अतिक्रमण हटविण्यासाठी न्यायालयात प्रभावी पाठपुरावा करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

सोलापूर शहरातील उड्डाणपूल, विमानसेवा, आयटी पार्क व पाणीपुरवठा आदी विषयांवर विधान भवनात आढावा बैठक झाली. त्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘मागील वर्षी पावसाळ्यातही विमानसेवा सुरू होती. मात्र, यंदा विमान कंपन्यांनी खोटे कारण देत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,’ हा मुद्दा मांडला आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आदेश दिले आहेत.

विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांविरोधात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कंपन्यांनी नाईट लॅंडिंग आणि दृश्यमानतेचे खोटे कारण पुढे करून विमानसेवा बंद ठेवली आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जून महिन्यात विमानसेवा सुरू करण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी अधिक पाऊस आणि ढगाळ वातावरण असूनही विमानसेवा सुरू होती.

यंदा पाऊस कमी असतानाही कंपन्यांनी खोटे कारण देत सेवा बंद केल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर सोलापूर विमानतळाचे संचालक माधवराव सोनकुसळे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पावसाळ्यातच विमानसेवा सुरू झाल्याची माहिती दिली आहे.

बोरामणी विमानतळासाठी मी स्वतः केंद्राशी पत्रव्यवहार करणार

बोरामणी विमानतळासाठी आवश्यक असलेली वनविभागाची जमीन आणि माळढोकचा अडथळा याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘मी स्वतः केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करणार आहे. माळढोकाबाबतची नेमकी स्थिती काय आहे, तसेच विमानतळासाठी आवश्यक असलेल्या ३४ एकर जमिनीच्या निर्वनीकरणाबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून ही अडचण दूर करण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT