SIR Work : एसआयआर कामात टाळाटाळ करणं भोवलं; सोलापुरात ‘बीएलओ’वर गुन्हा दाखल

Solapur BLO News : विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेत कर्तव्यात टाळाटाळ केल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेच्या लिपिकाविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
SIR News
SIR NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 July : विशेष मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेच्या कामात टाळाटाळ करणं सोलापूर महापालिकेच्या लिपिकास चांगलंच अंगलट आलं आहे. विशेष म्हणजे लिपिकास याअगोदर कर्तव्यात टाळाटाळ केल्याची नोटिस देण्यात आली होती. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केल्याने त्या लिपिकाच्या विरोधात शहरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी तथा सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी रामचंद्र साहेबराव माळी यांनी याबाबतची फिर्याद दिली होती. त्यानुसार सोलापूर महापालिकेचे लिपिक तथा बीएलओ रविकिरण मधुकर ढाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाकडून सोलापूरसह राज्यात २० जूनपासून विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन मोहीम राबविण्यात येत आहे. निवडणूक कार्यालयाकडून २७ जून रोजी गणना अर्ज (इन्युमरेशन फॉर्म) घेऊन त्यांचे वाटप करण्याच्या सूचना लिपिक रविकिरण ढाले यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, ढाले यांनी हे अर्ज ताब्यातच घेतले नाहीत.

रविकिरण ढाले यांच्याशी गणना अर्जाच्या संदर्भात दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा मोबाईलही बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर पर्यवेक्षकांनी त्यांच्या कार्यालयात आणि घरीही जाऊन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तेथेही आढळून आले नाहीत.

SIR News
Salil Deshmukh: अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांवर शरद पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी; नागपूरमध्ये मोठे संघटनात्मक बदल

वारंवार जाणीव करून देऊनही कर्तव्यात हलगर्जीपणा करणे, कामास टाळाटाळ करणे, ही गंभीर बाब आहे. त्यांनी वेळेत काम न केल्याने निवडणूक आयोगाच्या या मोहिमेवर विपरीत परिणाम झाला आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

SIR News
Gokul Election : ना महायुती, ना महाविकास आघाडी : स्थानिक राजकीय वादातून 31 संस्थांनी फिरवली ‘गोकुळ’कडे पाठ!

कर्तव्यात टाळाटाळ व हलगर्जीपणा केल्याप्रकरणी त्यांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्यावर कोणताही खुलासा केलेला नाही, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३४ अन्वये राष्ट्रीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com