MLA Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News : मुख्यमंत्र्यांना माशीसारखं बाजुला काढणे योग्य नाही : पृथ्वीराज चव्हाण

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Prithviraj Chavan News : आम्ही भाजपाबरोबर BJP जाणार नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वावड्या उठवायच्या चालल्या आहेत. कधी कॉग्रेसबद्दल, कधी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल, कधी माझ्याबद्दलही वावड्या उठवल्या गेल्या. आता भाजपाला या दृष्टचक्रातून बाहेर पडायचे आहे. नवीन लोकांना पक्षात घेण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांचा बळी जावु शकतो, ही चर्चा गंभीर आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणारी ही चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांना दुधातल्या माशी सारख फेकून द्यायच हे योग्य नाही. त्या पदाचा मान राखला गेला पाहिजे, अशी टिप्पणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी केली.

राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या वाटेवर आहेत का, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वावड्या उठवायच्या चालल्या आहेत. कधी कॉंग्रेसबद्दल, कधी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल, माझ्याबद्दलही वावड्या उठवल्या गेल्या. आता भाजपाला या दृष्टचक्रातून बाहेर पडायचे झाल्यास कुणाला तरी मुख्यमंत्री केलं पाहिजे.

त्या मुख्यमंत्र्यांना ढकलून दिलं तरी काही फरक पडणार नाही. पण हे योग्य नाही मुख्यमंत्री करायचं आणि दुधातल्या माशी सारखं त्याला फेकून द्यायच योग्य नाही. ते म्हणाले, राहुल गांधी मानहानीचा खटल्यात त्यांचे अपील सत्र न्यायालयाने मान्य केले नाही. त्यामुळे यापूर्वीची जी शिक्षा आहे तीच राहणार आहे. राहुल गांधी यांची लीगल टीम त्यावर काम करत आहे.

कमिशनर कायद्याखाली चौकशी करावी

खारघरमध्ये ज्यांना पुरस्कार दिला जाणार होता, त्यांनी वेळ ठरवल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. सरकारच्या कार्यक्रमाची वेळ सरकारच ठरवते. कुठल्यातरी राजकीय नेत्यांना दाखविण्यासाठी गर्दी केली. पण, त्यातील एकही माणूस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासाठी आलेले नव्हते. ते आप्पा साहेबांसाठी आले होते. तेथे मंडप टाकला गेला नाही. त्या प्रकरणाची कमिशनर कायद्याखाली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी श्री. चव्हाण यांनी केली.

अदानीची धडपड..

गौतम अदानी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे, याविषयी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कुणी कुणाला भेटावं, याबाबत मी बोलणं योग्य नाही. अदानी - शरद पवार यांचे अगोदरपासून संबंध आहेत. त्यामुळे ते भेटले असतील. मात्र, कॉंग्रेसची अदानीबाबतीत भूमिका कायम आहे.

लोक अडचणीत आल्यानंतर वाचण्यासाठी प्रयत्न करतात, तशी अदानी धडपड करत असेल, त्यासाठी यांनी भेट घेतली असावी. आमचे अदानीबद्दलचे प्रश्न कायम आहेत. त्याची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली पाहिजेत. कंपन्या विकून पैसे आणले आहेत, असे आदानी सांगत आहेत. मग बेनामी कंपन्याच्या माध्यमातून मॉरिशसमध्ये का पैसे गुंतवले, भारतात का गुंतवले नाहीत हे सांगावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT