Mumbai Fraud Case: धक्कादायक! जुहूतील मोक्याची व्यावसायिक जागा बळकावण्यासाठी वापरला चक्क न्यायालयाचा बनावट आदेश!

Juhu Fraud Case : मूळ मालक असलेल्या कर्णिक यांना बिहार समस्तीपुर न्यायालयाच्या नावाने अचानक 21 मार्च एक नोटीस मिळाली.
Court
CourtSarkarnama

Mumbai Crime News: मुंबईतील जुहू परिसरातील एक मोक्याची जागा बळकावण्यासाठी चक्क न्यायालयाचा बनावट आदेश तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच याप्रकरणी जुहू पोलिसांनी तपासात निष्काळजीपणा केल्याचंही समोर आलं आहे. योग्य तपास न केल्यामुळे दोन पोलीस अधिकाऱ्यांना आता सक्तीच्या रजेवर देखील पाठवण्यात आले आहे. यानंतर हे प्रकरण सांताक्रूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे.

याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक अनुपम कर्णिक यांनी जुहू पोलीस(Police) ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जुहू पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यानंतर सांताक्रुज पोलिसांनी आता याप्रकरणी दोन आरोपींनाअटक करण्यात आली आहे. अन्य तिघे फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहेत.

Court
Maharashtra News: साखर कारखान्यांच्या 'मार्जिन लोन'चा रिमोट कंट्रोल फडणवीसांकडेच; राज्य सरकारचा 'हा' मोठा निर्णय

काय आहे प्रकरण ?

जुहू परिसरातील ज्येष्ठ नागरिक अनुपम कर्णिक यांच्या मालकीचे चायना टाऊन नावाचे रेस्टॉरंट हे जॉलीटी हॉस्पिटीलिटी ग्रुपकडे पाच वर्षाच्या करारावर चालवण्यासाठी दिले. मात्र लॉकडाऊन काळात व्यवसाय बघायला आल्याने हा करार संपुष्टात आला. यानंतर जॉलीटी हॉस्पिटीलिटी ग्रुपचे भागीदार असलेल्या महेश शेट्टी, विजय ठाकरे आणि नाईक यांनी नरेंद्र थोरवेंना पुढे करून पुन्हा 2022 मध्ये नव्याने करार केला. थोरवे यांनी याच जागेवर सिल्क रूट नावाने व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

मूळ मालक असलेल्या कर्णिक यांना बिहार समस्तीपुर न्यायालयाच्या नावाने अचानक 21 मार्च एक नोटीस मिळाली. यात कोर्ट रिसिव्हर या जागेचा ताबा घेण्यासाठी 24 मार्चला येणार असल्याचे म्हटले होते. मात्र बिहारमध्ये आपल्या विरोधात कोणताही खटला प्रलंबित नसताना बिहारला गेल्यानंतर शेट्टी, नाईक आणि ठाकरे यांनी मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी कोर्ट रिसिव्हर दुबे यांच्या मदतीने कर्णिक यांच्या जुहूतील मालमत्तेत घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

Court
Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींना आज दिलासा मिळणार का ? : सुरत सत्र न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष...

जुहू पोलीस ठाण्याकडून याप्रकरणी योग्य तपास होत नसल्याचे निश्चित होताच हे प्रकरण सांताक्रुज पोलिसांकडे वर्ग केले. न्यायालयाचा आदेश बोगस असल्याचं निदर्शनास येताच मागील आठवड्यात सांताक्रुज पोलिसांनी याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल केला. आरोपींविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्र वापरणे, विश्वास भंग करणे, गुन्हेगारी कट रचणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

दोन पोलीस अधिकारी सक्तीच्या रजेवर

जुहू पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांनी योग्य तपास न केल्यामुळे दोन पोलीस अधिकाऱ्यांना आता सक्तीच्या रजेवर देखील पाठवण्यात आले आहे. शिवाय हॉटेल व्यवसायिक महेश शेट्टी आणि विजय ठाकरे यांना अटक केल्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट चुलत भाऊ हितेश नाईक यांच्यासह वकील आणि कोर्ट रिसिवर वी के दुबे व विशाल शहा यांना फरार घोषित करण्यात आले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com