Sangli News, 08 Sep : ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज निर्णायक भूमिका बजावणार असल्याची माहिती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत ओबीसी (OBC) समाज हा निर्णायक भूमिकेत असणार आहे. प्रत्येक पक्षांने ओबीसी बांधवांना प्रतिनिधित्व देऊन लढण्याची संधी द्यावी. त्या मिळालेल्या संधीचं विजयात रूपांतर करून ते संधीचं सोनं करतील.
मात्र, संधी न मिळाल्यास OBC समाजाने कोणाला मत द्यायचं आणि कोणाला पाडायचं हे ठरवलं असून त्याची यादी फिक्स असल्याचं ते यावेळी म्हणाले. ओबीसी समाजाची संघटनात्मक बांधणी आणि भविष्यातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी सांगलीत पार पडली. ही बैठक ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत बोलताना हाके (Laxman Hake) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ओबीसी समाज निर्णायक भूमिका बजावणार असून कोणाला पाडायचे आणि कोणाला विजयी करायचे हे ठरले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "आगामी विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी समाजाला वेगवेगळ्या पक्षांतून किती उमेदवारी मिळते, हे आम्ही पाहत आहोत. योग्य प्रतिनिधित्व मिळालं तरच आमचा पाठिंबा असेल अन्यथा, ओबीसी समाजाने देखील कोणाला मत द्यायचं आणि कोणाला पाडायचं हे ठरवले आहे.
ओबीसी समाज पहिल्यांदा ओबीसी एससी एसटी आणि अल्पसंख्यांकांना मतदान करेल. शिवाय कुणाला पाडायचं याची यादी निश्चित केली आहे," असा दावा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये कसं मतदान करायचं आणि कुणाला करायचं याचा प्लॅनच हाके यांनी तयार केल्याचं दिसत आहे.
तसंच यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबर पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत काँग्रेसच्या दुहेरी भूमिका घेणाऱ्या नेत्यांची माहिती देणार असल्याचंही सांगितलं. "राहुल गांधी ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी असं म्हणतात आणि त्यांचेच नेते याबाबत महाराष्ट्रात बोलायला तयार नाहीत. या दुहेरी भूमिका घेणाऱ्या नेत्यांविषयी आणि या या नेत्यांनी काँग्रेस कशी संपवली याबाबत पुढील आठवड्यात राहुल गांधीशी होणाऱ्या बैठकीत आपण बोलणार आहे."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.