NCP Vs BJP : नामफलकाला काळं फासलं; घोषणाबाजी केली, आता अजितदादांना पत्र देणार

BJP workers are upset with MLA Chetan Tupe : हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक झालेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहेत. तसतसं महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमधील वाद विकोपाला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे टाकताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या पक्षातील संभावित उमेदवाराला कशाप्रकारे नामोहरम करता येईल, याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक झालेत.

भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्न हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार चेतन तुपे करत असल्याचा आरोप भाजप पदाधिकांऱ्यांनी केला. त्यामुळे याचा निषेध भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासून केला. चेतन तुपे महायुतीचा महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप देखील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच याबाबत आपण उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याची पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना निवेदन देऊन आपली नाराजी व्यक्त करणार असल्याचं देखील नाराज पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे पुण्यातील वडगाव शेरी पाठोपाठ आता हडपसरमध्ये देखील युतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Ajit Pawar
Pune Congress : नेत्यांचे फोटो लावत नाहीत अन् आंदोलनालाही येत नाहीत, मग धंगेकरांना काँग्रेसचं तिकीट कशाला?

हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल आणि मांजरीचा नदी उड्डाणपूल यासाठी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळालेला, असताना विद्यमान आमदार भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांना डावलून श्रेय लाटत आहेत, असा आरोप शिवराज घुले यांना केला. मांजरी उड्डाणंपुलासाठी सुमारे 23 कोटी रुपये मंजूर असताना केवळ 14 कोटी 60 लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठविला. विद्यमान आमदाराच्या हस्तक्षेपामुळे पुलाचे रुंदी आणि उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतुककोंडीचा धोका निर्माण होईल, असा आरोप नगरसेवक बाळासाहेब घुले यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस हडपसरमध्ये भाजपला वारंवार डावलत असून आम्ही देखील महायुती धर्मास तिलांजली देणार, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर आल्याने महायुतीत मिठाचा खडा पाडलाय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Ajit Pawar
VIDEO: भाजप आमदाराला मारण्याची सुपारी? पोलीस कंट्रोल रुमला फोन

प्रत्येकाचा उचित सन्मान

आमदार चेतन तुपे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितलं की, "भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा, माझं आणि भाजप आमदार योगेश टिळेकर त्यांच्यासोबत व्यवस्थित टूनिंग आहे. ज्या संबंधित पुलाच्या उद्घाटनावरून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मुळात त्या पुलाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. नदीवर चार लेनचा पूल बांधण्यात येणार असून आत्ता फक्त दोन लेन पूर्ण झाले आहेत. उर्वरित दोन लेन पूर्ण झाल्यानंतर त्या पुलाचे उद्घाटन होईल आणि त्यावेळेस या पुलासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला आहे. त्यांच्या प्रत्येकाचा उचित सन्मान केला जाईल".

आमच्यामध्ये कोणतेही वाद नाही

'ज्या नामफलकाला काळे फासण्यात आलं तो नामफलक मुळात आम्ही लावलेला नसून पाटबंधारे विभागाने तो एक दीड वर्षांपूर्वी लावला आहे. तसंच या पावसाळ्यामध्ये जुना पूल पाण्याखाली गेल्याने तात्पुरत्या स्वरूपात पोलिसांनी नागरिकांसाठी हा पूल खुला केला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा जो काही गैरसमज झाला असेल तो दूर करण्यात येईल, तसेच आमच्यामध्ये कोणतेही वाद नाही', असंही चेतन तुपे यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com