vinay kore  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vinay Kore: विचारधारा सांगणाऱ्यांनी ती टिकवली का? शिवसेना, राष्ट्रवादीवर विनय कोरेंचा हल्लाबोल

Vinay Kore Speech in Janasurajya Shakti Party Rally: विचारधारेवर लोकांना संघटित केलं त्यांचा विश्वास राखला का ? असा प्रश्न देखील आमदार कोरे यांनी उपस्थित करत या प्रकारामुळे महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये आपण राजकारणात आणि समाजकारणामध्ये का आलो असं प्रश्न निर्माण झाला असे देखील नंतर कोरे यांनी व्यक्त केलं.

Rahul Gadkar

Sangali News:विचारधारा म्हणून लोकांच्या समोर गेलेले पक्ष,आपली विचारधारा टिकवू शकले का ? उद्धव ठाकरे काँग्रेससोबत बसतील स्वप्नात देखील वाटलं होतं का ? आणि शरद पवारांच्या पक्षाचा एक गट भाजपासोबत जातो,अशी प्रकारची विश्वासार्हता लोकांच्या पातळीवर कधी अपेक्षित केले नव्हती,पण सर्व महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षात घडलं,असे विधान जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनायक कोरे यांनी केले आहे.

या विचारधारेवर लोकांना संघटित केलं त्यांचा विश्वास राखला का ? असा प्रश्न देखील आमदार कोरे यांनी उपस्थित करत या प्रकारामुळे महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये आपण राजकारणात आणि समाजकारणामध्ये का आलो असं प्रश्न निर्माण झाला असे देखील नंतर कोरे यांनी व्यक्त केलं. सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

मराठवाड्याला पुन्हा उभा करण्यासाठी केवळ एकरी मदत आणि राजकारण करण्यापेक्षा वेगळ्या पध्दतीने मदत करण्याची गरज असल्याचं मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनायक कोरे यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांचं केवळ पीकच नाही, तरी माती देखील वाहून गेली आहे. शेतीची हद्द फिक्स करणं देखील मुश्कील होणार आहे. अशा या मूलभूत समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे त्या दीर्घकालीन तिथल्या जनमानसाच्या जीवनावर परिणाम करणार आहेत. त्या उपाय योजनांच्यासाठी धरतीवरचे काम करावे लागणार असून आम्ही त्यासाठी आग्रह असणार असल्याचे ही आमदार विनय कोरे यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकतीने लढविण्याचा निर्धार जनसुराज्य शक्ती पक्षाच्यावतीने करण्यात आला.सांगलीच्या मिरजेमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यामध्ये हा निर्धार करण्यात आला असून भाजपासोबत समन्वयातून निवडणूक लढवल्या जातील, असं देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

विनायक कोरे यांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका – कोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटले की, "जनतेपासून दुरावलेले आणि केवळ मुंबईपुरते मर्यादित राहिलेले नेते महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना भिडू शकत नाहीत."

राजकीय महत्त्व

  • या मेळाव्यातील भाषणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

  • विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण मतदारांमध्ये विनय कोरे यांचे भाषण चांगलेच चर्चेत आले.

  • कोरे यांनी केलेल्या "लोकहितासाठी नव्या राजकारणाची गरज" या संदेशामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT