crime news Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Headmaster Dispute Case : मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेण्यावरून धमक्या, दमदाटी अन् बेदम मारहाण : दोन शिक्षिकांमधील वादाने 17 जणांवर गुन्हा दाखल

Jat School Headmaster Dispute Row News : मुख्याध्यापक पदाच्या कार्यभारावरून वाद उफाळला असून १७ जणांवर परस्परविरोधी तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

Sangli Crime News : मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की व मारहाण केल्याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात एकूण १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रुक्मिणी शिंदे आणि विमल चव्हाण यांनी याबाबत परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.

रुक्मिणी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ ते ११ ऑगस्टदरम्यान संशयित त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यांनी मुख्याध्यापकपदाची खुर्ची खाली करण्यास सांगून विमल चव्हाण यांच्या पदभारासंदर्भात वाद घातला.

यावेळी शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की करण्यात आली. आपली मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती न्यायालयाच्या आदेशानुसार झालेली असून, शिक्षण विभागाकडून पदभाराबाबत कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

विमल चव्हाण (वय ५३, रा. शेगाव, ता. जत) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेतल्याच्या कारणावरून शाळेतील कार्यालयात वाद घालून शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. तसेच संग्राम शिंदे यांनी कारने उडवून देण्याची, तर अन्य एकाने खोटे गुन्हे दाखल करून नोकरी घालवण्याची धमकी दिली.

मुख्याध्यापिका रुक्मिणी गुलाबराव शिंदे यांना शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की व मारहाण केल्याच्या आरोपावरून ११ जणांविरुद्ध, तर शिक्षिका विमल चव्हाण यांना शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की व मारहाण केल्याच्या आरोपांवरून ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी तक्रारींवरून जत पोलिस ठाण्यात एकूण १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT