Jawali BJP News : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jawali BJP News : जावलीकरांना हवाय आणखी एक आमदार....हे आहे कारण ?

Umesh Bambare-Patil

Jawali BJP News : जावली तालुक्याचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांना त्यांनी जनतेसाठी केलेल्या विधायक,राजकीय कामाचा सन्मान व्हावा. यासाठी त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशा मागणीचे निवेदन जावलीकरांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले.

जावलीकरांनी Jawali दिलेल्या निवेदनात म्हटले की, वसंतराव मानकुमरे यांना जावली तालुक्याची मुलुख मैदान तोफ समजली जाते. समाजकारण आणि राजकारणात पदार्पण केल्यावर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून जावली तालुक्याचा सभापती होण्याचा मान पटकावला. त्यानंतर त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून Satara Loksabha दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवली.

या निवडणुकीत मानकुमरे यांनी दोन नंबरची मते घेतली. तसेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना जावली तालुक्यातुन मताधिक्य देण्याचे मोलाचे काम मानकुमरे यांनी केले. याशिवाय जावली तालुक्यात अनेकांना मदतीचा हात दिला आहे.

मुंबईत माथाडी कामगारांना न्याय आणि हक्काची घरे मिळवून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत मानकुमरे हे कलाकार,लेखक,नाटककार असून त्यांनी लिहलेले नाटक रंगमंचावर गाजले होते राजकारणात काम करत असताना त्यांनी नेहमी निष्ठतेला महत्त्व दिले असून अशा जनतेच्या सेवकाला त्याच्या कार्याचा सन्मान म्हणून भाजपाच्या कोट्यातून विधान परिषदेत काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी जावलीकरांनी भाजप नेतृत्वाकडे केली आहे.

यावर मानकुमरे यांचे जावली तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान असून त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू अशी ग्वाही धैर्यशील कदम व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली. त्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जाऊन याबाबतची मागणी करणार असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले.

निवेदनावर प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर,उद्योजक विजयराव शेलार, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार,'किसन वीर' चे संचालक हिंदुराव तरडे, तानाजी शिर्के, रवींद्र परामणे, हनुमंतराव पार्टे, संदीप परामणे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, मालोजी शिंदे, प्रमोद शिंदे, नगरसेवक शशिकांत गुरव, विकास देशपांडे, मच्छिंद्र क्षीरसागर, गीता लोखंडे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT