Satara News : आमदार स्टीकर लावून फिरतात नातेवाईक; कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Satara सातारा जिल्हयात हिरव्या रंगाचे आमदार स्टिकर लावून अनेक आमदार, त्यांचे नातेवाईक राजरोसपणे बेकायदेशीरपणे फिरत असतात.
MLA sticker
MLA stickersarkarnama
Published on
Updated on

Satara News : आमदार असा स्टिकर लावून राज्यभरात फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी. वास्तविक केवळ अधिवेशनाच्या काळासाठी आमदारांना हे स्टिकर लावण्यासाठी परवानगी असताना त्यानंतर ही आमदार, त्यांचे नातेवाईक राजरोजसपणे बेकायदेशीरपणे संपूर्ण राज्य आणि सातारा जिल्हयात फिरत आहेत. अशा वाहनांवर कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा तात्काळ दाखल करावा, अशी मागणी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

याबाबत योग्य ती कारवाई १३ ऑगस्टपर्यंत न झाल्यास दि. १४ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना Satara collector आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. याबाबत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्याकडे २२ फेब्रुवारी २०२३ रोजी माहिती अधिकारात श्री. सुशांत मोरे यांनी अर्ज केला होता. त्या अर्जावर २४ मार्च २०२३ रोजी आमदार MLA स्टिकर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून वितरीत करण्यात येत नाहीत असे लेखी कळवले होते.

त्यानंतर दि. ५ एप्रिल २०२३ रोजी माहिती अधिकारात पुन:श्च संबंधित विभागाकडे अर्ज करून गाडीवर लावण्याकामी दिल्या जाणा-या स्टिकरची नियमावली, स्टिकरची छायांकित प्रत आणि एक आमदारांना वाहनासाठी स्टिकरची दिल्या जाणा-या संख्या याची माहिती मागविली होती. त्यावर अधिवेशनाच्या कालावधीत त्या अधिवेशनाच्या मर्यादीत कालावधीकरता विधानमंडळ सदस्यांना वाहनांद्वारे विधानभवन परिसरात प्रवेश करता यावा, यासाठी वाहन प्रवेशपत्रिका वितरीत करण्यात येते अशी माहिती लेखी देण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करून सातारा जिल्हयात हिरव्या कलरचे आमदार असे स्टिकर लावून त्यामध्ये विधानमंडळाचा लोगो लावून जिल्हयातील अनेक आमदार, त्यांचे नातेवाईक राजरोसपणे बेकायदेशीरपणे संपूर्ण सातारा जिल्हयात फिरत असतात. विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीनंतर ही हिरवे स्टिकर लावण्याची परवानगी नसताना तसेच अधिकृत स्टिकर नसल्याने विधान मंडळ सचिवालयाने लेखी दिले आहे.

MLA sticker
Prithviraj Chavan असे काही बोलले, Shambhuraj Desai अक्षरश: तळतळले | Shivsena | Congress | Sarkarnama

सातारा जिल्हयातील आमदार स्टिकर लावणा-या वाहनांवर कारवाई करून फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा. यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यास संबंधित आमदार, विधानपरीषद सदस्य यांच्यावर अपात्रतेची आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी. १३ ऑगस्टपूर्वी अशा सर्व वाहनांवर कारवाई करावी. अन्यथा मला जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे १४ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणास बसावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com