Jawali APMC Chairman, Deputy Chairman
Jawali APMC Chairman, Deputy Chairman sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jawali-Mahabaleshwar APMC : सभापतीपदी जयदिप शिंदे, उपसभापतीपदी हेमंत शिंदे; बिनविरोध निवडी

Umesh Bambare-Patil

Jawali-Mahabaleshwar APMC : जावळी महाबळेश्वर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सोनगाव [ता. जावली] येथील जयदिप शिंदे यांची तर उपसभापतीपदी कुडाळ येथील हेमंत शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जावली-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची APMC पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली होती, एकुण 18 संचालकांच्या जागेसाठी ही निवडणुक झाली होती. यामध्ये शेतकरी विकास पॅनेलने Shetkari Vikas Panel सर्वच्या सर्व 18 जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एकहाथी सत्ता स्थापन केली होती.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील या तिन आमदारांनी आपापासातले पक्षीय पातळीवरील गट तट व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेऊन ही निवडणुक एकत्रित लढवून सर्व जागांवर विजय मिळवला होता. त्यानुसार आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाला 8 जागा, आमदार शशिकांत शिंदे गटाला 5 जागा व आमदार मकरंद पाटील गटाला 5 जागा असा जागावाटपाचा फाँम्युर्ला ठरवण्यात आला होता.

त्यामुळे सर्वाधिक जागा आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाच्या निवडून आल्याने आज झालेल्या पदाधिकारी निवडीत सभापतीपदी आमदार भोसले यांचे कट्टर समर्थक जयदीप शिंदे यांची निवड करण्यात आली तर दुसरीकडे आमदार शिंदे गटाकडे उपसभापतीपद गेल्याने आमदार शिंदे गटाकडून हेमंत शिंदे यांना उपसभापतीपदी संधी देण्यात आली.

जावळी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचीत सदस्यांची पदाधिकारी निवडीसाठी आज ता. 25 रोजी बाजार समितीच्या कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी सभापतीपदासाठी जयदिप शिंदे यांचे नाव संचालक राजेंद्र भिलारे यांनी सुचित केले त्यास मच्छींद्र मुळीक यांनी अनुमोदन दिले.

तसेच उपसभापती पदासाठी हेमंत शिंदे यांचे नाव संचालक बुवासाहेब पिसाळ यांनी सुचीत केले त्यास मनेष फरांदे यांनी अनुमोदन दिले. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या. प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अधिकारी नानासाहेब रुपनवर यांनी निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहिले.

नवनिर्वाचीत सभापती, उपसभापती व सदस्यांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा बँकेंचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, अमित कदम यांनी पदाधिका-यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT