Pune News : ...तोपर्यंत बालभारती ते पौडफाटा रस्त्याचं मार्किंग थांबवा! ; गोऱ्हेंची महापालिका आयुक्तांना सूचना

Neelam Gorhe : बालभारती ते पौड फाटा या प्रस्तावित रस्त्यावरुन चांगलाच वाद पेटला .
Dr. Neelam Gorhe
Dr. Neelam GorheSarkarnama

Pune : पुणे महापालिकेमार्फत वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा रस्ता प्रस्तावित केला आहे. या रस्त्यावरुन चांगलाच वाद पेटला आहे. पर्यावरणप्रेमींनी या रस्त्याला विरोध दर्शवला आहे. विदयापीठ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, कोथरूड व सेनापती बापट रस्ता भाग सोडला जाऊन वेळेची बचत होईल असा दावा महापालिका करत आहे. पण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली टेकडी फोडून तेथे रस्ता केला जाऊ नये, वृक्षतोड करून पर्यावरण धोक्यात आणू नये अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे(Neelam Gorhe) यांनी याबाबत आता पुणे महापालिका आयुक्तांना महत्वपूर्ण सूचना केली आहे. वेताळ टेकडीवरील बालभारती पौड फाटा नियोजित रस्ता लक्षात येण्यासाठी महापालिकेतर्फे सिमेंटचे खांब लावून रेखांकन (मार्किंग) करण्याचे काम करू नये. या प्रकल्पाबाबत आलेल्या हरकतींवरील सुनावणी होईपर्यंत कोणतेही काम करू नये असं गोऱ्हे म्हटलं आहे.

Dr. Neelam Gorhe
Nitesh Rane : 'हिच ती वेळ..उरलेलं दुकान बंद करण्याची..' ; राणेंचा ठाकरेंना टोला

पुणे महापालिके(PMC)च्या वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा रस्ता प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सध्या ठप्प आहे. बालभारती पौड फाटा रस्ता नेमका कुठून जाणार आहे हे नागरिकांना कळणे आवश्‍यक आहे, त्यामुळे नियोजित मार्गांवर टेकडीवर सिमेंट काँक्रिटचे २५० खांब उभे करून रेखांकन करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यास डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोध केला आहे.

गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या..?

पुणे(PUNE)शहरातील पर्यावरण संरक्षणामध्ये काम करणाऱ्या संस्थांना सहभागी करून त्यांचे हरकतीचा सकारात्मक विचार करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. यानुसार आपल्याकडे ज्या हरकती प्राप्त आहेत त्याबाबत सुनावणी होईपर्यंत टेकडीवर कोणतेही काम करू नये व वृक्षतोडही करण्यात येऊ नये अशा सूचना संबंधितांना तत्काळ देण्यात याव्यात. तसेच याबाबत आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मला सादर करावा, अशा सूचना गोऱ्हे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.

Dr. Neelam Gorhe
Mumbai News : फडणवीसांची मोठी घोषणा ; झोपडपट्टीधारकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, अडीच लाखात..

या प्रकल्पामध्ये अनेक झाडे तोडली जाणार आहेत. याबाबत मी आपणांस २५ एप्रिल २०२३रोजी लेखी पत्र पाठवून हे थांबविण्याबाबत कळवले होते. या पत्रामध्ये न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे वृक्षतोड करू नये तसेच रहदारी कमी करण्यासाठी सदर रस्त्याचा उपयोग किती होणार आहे याचेही सर्वेक्षण करावे असंही गोऱ्हे यांनी सांगितलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com