jayant patil-Gopichand Padalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांना आज शांत झोप लागेल; पण त्यांच्या मंत्रिपदामुळे मला काही फरक पडत नाही : गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

Solapur Tour News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर जयंत पाटील यांच्या मंत्रिपदाची चर्चा रंगली आहे. त्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्रिपद मिळाले किंवा नाही, मला फरक पडत नसल्याचे म्हटले.

विश्वभूषण लिमये

Solapur, 16 July : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यात माजी मंत्री जयंत पाटील यांचाही समावेश आहे. त्यांच्या मंत्रिपदाबाबत राज्यात चर्चा सुरू असून त्याबाबत त्यांचे सांगलीतील विरोधक आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट प्रतिक्रिया देताना ‘त्यांना मंत्रिपद मिळालं अथवा न मिळालं तरी मला काही फरक पडत नाही,’ असे म्हटले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर हे भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आज सोलापूरमध्ये आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या मंत्रिपदावर भाष्य केले.

ते म्हणाले, जयंत पाटील यांना मंत्रीपद मिळणार की मिळणार नाही, हे मला माहिती नाही. त्यांना मंत्रिपद मिळालं, नाही मिळालं, त्याचा मला काही फरक पडत नाही.

जयंत पाटील यांच्याबाबत पत्रकारांनी पुन्हा बोलते केल्यानंतर पडळकरांनी पत्रकारांनाचा टोला लगावला. जयंत पाटलांची तुम्हाला खूप काळजी लागलेली दिसते. मात्र, तुमच्या आजच्या बोलण्याने त्यांना काहीतरी आधार मिळेल. आजची झोप तर त्यांना शांतपणे लागेल, असेही पडळकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एनडीएमधील सहभागाच्या चर्चेवर गोपीचंद पडळकर म्हणाले, ह्या सर्व चर्चा मी फक्त मीडियाच्या माध्यमातून ऐकल्या आहेत. ते आमच्या सोबत येणार की नाही येणार हे सर्व आमचे वरिष्ठ ठरवतील. त्या विषयी माझ्याकडे अधिकची माहिती नाही.

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना माहिती नव्हती. याबाबत दत्तात्रेय भरणे यांनी केलेले विधान हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्याबद्दल त्यांच्या पक्षाचे लोक भूमिका मांडतील, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या अर्थ खात्यावरील दाव्याबाबत बोलताना पडळकर यांनी ‘महाराष्ट्राला सक्षम मुख्यमंत्री मिळाले आहेत, त्यामुळे ते सगळी काळजी घेतील. आपण चिंता करण्याची गरज नाही,’ असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT