Builder Suicide : अनेक लोक आत्महत्या करतील, त्यात माझाही नंबर असेल : बिल्डर आत्महत्या; धंगेकरांचा धक्कादायक खुलासा, पत्नीच्या भागीदारीबाबतही भाष्य...

Ravindra Dhangekar clarifition : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे. त्यावर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी खुलासा करत महत्त्वाचे दावे केले आहेत.
Khalil Sheikh-Ravindra Dhangekar
Khalil Sheikh-Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 16 July : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख याने व्हिडिओ तयार करून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा उल्लेख केला आहे. त्याबाबत माजी आमदार धंगेकर यांनी खुलासा केला असून त्यात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माजी आमदार धंगेकर म्हणाले, आम्ही चार ते पाच जणांनी पुणे शहरातील एक जागा थोडे थोडे पैसे टाकून विकसनासाठी विकत घेतली होती. त्यात बाळासाहेब शेडगे, रघु गौडा, आहेर, माझी पत्नी आणि माझे सहकारी अशा पाच जणांचा समावेश होता. त्या प्रोजेक्टचा कायदेशीर प्लॅन केला, रेरा पास केला. त्यानंतर महानगर बॅंकेने आम्हाला पाच कोटींपेक्षा जास्त रक्कमेचे कर्ज दिले.

पुढच्या काळात मी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवली. तिथूनच या प्रोजेक्टला खऱ्या अर्थाने गळती लागली. ती जागा वक्फ बोर्डाशी कोठेही संलग्न नव्हती. त्या जागेवर वक्फ बोर्डाचं नाव असतं, तर महानगर बॅंकेने एवढं मोठं कर्ज दिलं नसतं. तसेच रेराने आम्हाला परवानगी दिली नसती त्यामुळे प्रोजेक्ट मंजूर झाला नसता, असेही धंगेकर यांनी नमूद केले.

ते म्हणाले, हा प्रोजेक्ट रन करताना आम्हाला नोटीस आली. ही जागा वक्फ बोर्डाची आहे, त्यामुळे तुम्ही हा प्रोजेक्ट थांबवावा, असं त्या नोटिशीच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आले. ती नोटीस आल्यानंतर मी अधिकाऱ्याला जाऊन भेटलाे आणि सांगितलं की, तुम्ही जे हे करत आहात, त्यामुळे अनेक जण आत्महत्या करतील आणि त्यात माझाही नंबर असेल. कारण हा प्रोजेक्ट करताना आम्ही सर्व कायदेशीरपणे केले आहे, वकिलांकडून से घेतला आहे आणि आमचा प्रोजेक्ट रजिस्टरही झाला आहे.

Khalil Sheikh-Ravindra Dhangekar
Pankaja Munde: सुनेत्रा वहिनी पालकमंत्री, तरी बीडची खरी 'पालक' मीच; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या!

त्या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, धंगेकरसाहेब आम्ही तुमची माफी मागतो, आम्हाला वरून प्रेशर आहे. त्यामुळे आम्ही वक्फ बोर्डाची नोटीस आम्ही तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर बाळा शेडगे हे राज ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि अनेक लोकांना भेटले. चुकीचं असेल तर आम्ही प्रोजेक्ट सोडून देतो, असे सांगितले. पण काही राजकीय लोकांकडून अटी टाकण्यात आल्या. त्यामुळे तो प्रोजेक्ट रखडला, असा दावा धंगेकर यांनी केला.

ते म्हणाले, उच्च न्यायालयाकडून आम्हाला क्लीनचिट मिळाली, त्यामुळे वक्फ बोर्डाचा संबंध राहिलेला नाही. पण चार वर्षे रखडलेला प्रोजेक्ट, बॅंकेचे लोन आणि थांबलेले काम यामुळे आमचा हा प्रोजेक्ट ढासळला. त्यामुळे आमच्यातील बोलणं होत नव्हतं. मी सकाळी माहिती घेतली त्यावेळी शेडगे यांनी सांगितले की आपण त्याला ७० ते ८० लाख रुपये पोच केले आहेत.

Khalil Sheikh-Ravindra Dhangekar
Solapur Air Service : मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर जमिनीवरील स्टार एअरलाईन्सचे अखेर ‘उड्डाण’: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा सुरुवात

जीएसटीचे पैसे न भरल्याने त्यात त्रुटी आहेत. त्याचे २५ लाख रुपये भरले नाही तर आपल्याला भरावे लागतील. त्यामुळे आम्ही थांबलो होतो. तो व्यवहार होत नव्हता. माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी साईटवर कधीही जात नव्हतो. तसेच, मी २०२५ मध्ये माझे पत्नीने भागीदारी मागे घेतली आहे, असेही रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com