Dhairysheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairysheel Mohite Patil : माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांच्या हाती तुतारी; शरद पवार गटाचा दहावा उमेदवार जाहीर

Madha Lok Sabha Constituency : भाजपला 400 पार जायचे आहे कारण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली घटना बदलायची आहे. आपल्याला मात्र घटनेने दिलेली ताकद गमावू द्यायची नाही.

Sunil Balasaheb Dhumal

Madha Lok Sabha Political News : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा संधी दिली. त्यामुळे पुतणे धैर्यशील मोहिते पाटलांसाठी आग्रही असलेले भाजपनेते विजयसिंह मोहिते पाटील Vijaysingh Mohite Patil नाराज होते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी जयंत पाटलांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांच्या रुपाने पक्षाचा दहावा उमेदवारही जाहीर केला. आता माढ्याची लढत नाईकनिंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. Dhairysheel Mohite Patil Joins NCP Sharad Pawar.

महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला 21, काँग्रेसला 17 तर शरद पवार गटास 10 जागा मिळाल्या आहेत. शरद पवार Sharad Pawar गटाने आतापर्यंत तीन याद्यांच्या माध्यमातून नऊ ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले होते. मात्र दहावी म्हणजे माढा जागेचा निर्णय वेट अँड वॉचवर होता. त्या ठिकाणी आता धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. धैर्यशील यांचा विजय पक्का असल्यानेच येताना 'ए - बी फॉर्म'ही आणला आहे. आता 16 एप्रिलला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे, असेही पाटलांनी यावेळी स्पष्ट केले.

जयंत पाटलांनी Jayant Patil भाजपवर सडकून टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात फिरताना भाजपविरोधात नाराजी असल्याचे दिसते. महागाई प्रचंड वाढलेली आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. 2014 मध्ये ज्या घोषणा झाल्या त्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या देशावर 210 लाख कोटींचे कर्ज केले आहे. याची जाण झाल्याने आता जनता जागृत झाली आहे, असेही पाटील म्हणाले.

सध्या माढा लोकसभा मतदारसंघात पाचही आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत. मात्र खासदार किंवा आमदार होण्यासाठी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटलांचा आशीर्वाद लागतो. तो आशीर्वाद आपल्या बाजूने असल्याने विजयाची चिंता नाही. मात्र कुणीही गाफील राहू नये. रात्री-अपरात्री फोन येतात. ब्लॅकमेलिंग करण्याचे धंदे सध्या सुरू आहेत. त्यामुळे बूथनुसार काम करण्याचे आवाहन पाटलांनी माढ्यातील कार्यकर्त्यांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT