Pune Political News : शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेत खासदार अमोल कोल्हे सडकून टीका केली. तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट खासदार हवा, अशा शब्दात अजित पवारांनी नाव न घेता कोल्हेंच्या कारभाराचे वाभाडे काढले. या टीकेला उत्तर देताना कोल्हेंनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. त्यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गटात वाद होण्याची शक्यता आहे. Amol Kolhe Attack on Ajit Pawar.
खासदार अमोल कोल्हे दूरदर्शनच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी रविवारी (ता. 14) उपस्थित होते. पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सोपावल्याने ते मुंबई येथील दूरदर्शनच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या टीकेकर ट्विटच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे. कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही पण 'स्वकर्तृत्वसम्राट' नक्की आहे, असे म्हणत अजित पवारांवर निशाला साधला आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
2001 साली “सांगा उत्तर सांगा” या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो ते माझे ‘काका’ अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही, तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर.. आणि योगायोगाने आज 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो… ते ही काकांच्या नाही तर ‘स्व’कर्तृत्वाच्या जोरावर, असा म्हणत कोल्हेंनी अजित पवारांना टोले लगावले आहेत.
अजित पवारांची टीका
महायुतीचे शिरुरचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी हडपसर येथे सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी अजित पवारांनी कोल्हेंवर सडकून टीका केली. तसेच कोल्हेंच्या राजीनाम्याबाबत काय घडले होते, तेही सांगितले. ते म्हणाले, आताच्या खासदारने मतदारसंघात किती संपर्क ठेवला, त्यांनी किती कार्यक्रमांना उपस्थिती लावली, लोकांसाठी ते किती उपलब्ध होते, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला नटसम्राट खासदार हवा की कार्यसम्राट खासदार हवा, असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थितांना करत कोल्हेंवर टीका केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.