Vishwajeet 
kadam. Vishal Patil, Jayant Patil
Vishwajeet kadam. Vishal Patil, Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : 'नाव लक्षात राहू द्या..' जयंत पाटील अन् काँग्रेस नेत्यांंमधील वाद चिघळणार; 'त्या' व्हिडिओनं वातावरण तापलं

Deepak Kulkarni

Sangli News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या (ठाकरे गट) चंद्रहार पाटलांना पराभवाची धूळ चारत अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी सांगली जिंकली. या निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांविरोधात दंड थोपटलं.

तेव्हापासून आजतागायत हा वाद धगधगताच राहिला आहे. खासदारकी मिळाल्यानंतर विशाल पाटलांसह विश्वजीत कदमांनी जयंत पाटलांना टार्गेट केलं आहे.आता जयंत पाटलांच्या समर्थकांनीही आक्रमक भूमिका घेत काँग्रेसच्या कदम आणि पाटलांना कडक इशारा दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता असतानाच आता महाविकास आघाडीत आणखी एक वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.आमदार जयंत पाटील समर्थकांनी काँग्रेसच्या नेत्यांना सोमवारी (ता.17) सोशल मीडियाच्या माध्यमातून पलटवार केला आहे.

आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या आवाजात सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.त्यात जयंत पाटील गोड बोलतात,पण त्यांचा विरोध अजून तुम्ही बघितलेला नाही.मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळच गमवाल,एवढंच सांगतो असा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर सांगली मतदारसंघातले राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

कसबे डिग्रजमध्ये शनिवारी (ता.15) रात्री आमदार विश्वजीत कदम व नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी इस्लामपूर-वाळवा मतदारसंघात यापुढे दसपटीने लक्ष घातले जाईल असं विधान करत जयंत पाटलांना ललकारलं होतं. थेट मतदारसंघात येऊनच आव्हान दिल्यानंतर आता जयंत पाटील समर्थकही मैदानात उतरले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT