Mahayuti Politics : नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी? शिंदेसेनेविरोधात अजित पवार गट 'अ‍ॅक्टिव्ह'

Eknath Shinde Vs Ajit Pawar : महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेना पक्षाचे आहेत. त्यांना भाजपचाही पाठिंबा आहे.
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama

Nashik Teacher Constituency : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेचे पडघम वाजू लागले. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्यातच नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवारापुढे अजित पवार गटाने आव्हान उभे केले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीत बिघाडी झाली का, अशी चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी अजित पवार Ajit Pawar गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्या प्रचारासाठी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण मैदानात उतरले आहेत. भावसार यांचा प्रचार आणि नियोजनासाठी सूरज चव्हाण रणनीती आखताना दिसत आहेत. परिणामी महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गटात खटके उडण्याची शक्यता आहे.

याबाबत सूरज चव्हाण म्हणाले, महेंद्र भावसार हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन महेंद्र भावसार यांच्या प्रचाराचा नियोजन करण्यात आले आहे. आम्ही दोस्तीत कुस्ती न करता मैत्रीपूर्ण लढत लढतोय, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेना पक्षाचे आहेत. त्यांना भाजपचाही पाठिंबा आहे. मात्र आम्ही मैत्रीपूर्ण लढत देत आहोत. दरम्यान, महाविकास आघाडीकडून आमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला आहे. आघाडीतील काही नेत्यांकडून थेट आमच्या उमेदवाराला संपर्क करण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोटही सूरज चव्हाणांनी केला.

Eknath Shinde, Ajit Pawar
Video Chhagan Bhujbal : छगन भुजबळ पंतप्रधान मोदींकडे करणार 'ही' मोठी मागणी

दरम्यान, माघारीनंतर नाशिक शिक्षक मतदारसंघात एकूण 21 उमेदवार रिंगणात आहेत. यातील शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भावसार भाजपचे बंडखोर विवेक कोल्हे अशी चौरंगी लढत होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde, Ajit Pawar
South Solapur Assembly : दक्षिण सोलापूरसाठी माने, हसापुरे, मिस्त्री इच्छूक; सुशीलकुमार शिंदे कोणाला तिकिट देणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com