Opposition leader Jaykar Jadhav addresses the media after claiming that five more NCP councillors in Ishwarpur could face disqualification. The Ishwarpur politics controversy has intensified following the mayor's removal. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : जयंत पाटलांना अजून धक्के बसणार; ईश्वरपूरमध्ये नगराध्यक्ष, त्यांचे बंधू अन् अजून 5 जण अपात्र ठरणार?

Ishwarpur Nagaradhyaksha Disqualification News: नगराध्यक्ष आनंदराव मालगुडे आणि त्यांच्या बंधूचे पद रद्द झाल्यानंतर आणखीन पाच जण अपात्र करण्याच्या हालचाली विरोधी गटाकडून सुरू आहेत, असा दावा जयकर जाधव यांनी केल्यानंतर शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Rahul Gadkar

Sangli News, 16 Jul : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री जयंत पाटील यांच्या गटाची सत्ता असलेल्या उरण ईश्वरपूरमध्ये विरोधी गटांकडून सत्ताधाऱ्यांची सातत्याने विकेट घेतली जात आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवकाचे पद अतिक्रमणावरून अपात्र केल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर नजर ठेवली आहे.

नगराध्यक्ष आनंदराव मालगुडे आणि त्यांच्या बंधूचे पद रद्द झाल्यानंतर आणखीन पाच जण अपात्र करण्याच्या हालचाली विरोधी गटाकडून सुरू आहेत, असा दावा जयकर जाधव यांनी केल्यानंतर शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. लवकरच यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगितल्याने सत्ताधारी नगरसेवकांमध्ये धाकधूक वाढली आहे.

ईश्वरपूर नजीक असणाऱ्या कामेरी गावाच्या परिसरात 24 वर्षांपूर्वी झालेल्या बांधकामाची माहिती मिळवत शिवसेना वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकर जाधव यांनी ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मालगुडे व त्यांचे बंधू सुनील मालगुडे यांच्यावर अतिक्रमण केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी घोष यांनी नगराध्यक्ष आनंदराव मालगुंडे आणि त्यांचे बंधू सुनील मालगुंडे यांना पदावरून अपात्र ठरवण्याचा निकाल दिला. नगराध्यक्ष आणि बंधू यांचे पद अपात्र झाल्यानंतर ईश्वरपूरच्या राजकारणात खळबळ उडाली.

तसेच सत्ताधारी गटांमध्ये देखील धाकधूक वाढली आहे. दोघेही अपात्र होताच जयकर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे आणखीन पाच नगरसेवकांचा डाटा तयार आहे. असे म्हणत लवकरच यांच्याबाबत कारवाई संदर्भात तक्रार देणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले. जाधव यांच्या यामुळे सत्ताधारी नगरसेवकांमध्ये चांगलीच धाकधूक वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT