Jayant Patil-Silver Oak Attack Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटील म्हणाले, हल्ला करणारे एसटीचे कर्मचारी नसावेत...

जयंत पाटील यांनी ( Jayant Patil ) भाजप व गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

अमित आवारी

अहमदनगर - जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यानंतर जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना भाजप व गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. ( Jayant Patil said, the attackers should not be ST employees ... )

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर जयंत पाटील म्हणाले, काल संध्याकाळी उच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यावेळी ज्यांनी भाषणे केली. माथी भडकविण्याचे काम केले असेल तर ते तपासले पाहिजे. शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे खरोखर एसटीचे कर्मचारी नसावेत, असे मला वाटते. शरद पवारांनी मागील 40 वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मदत करून आधार देण्याचे काम केले. खरा एसटी कर्मचारी कधीही शरद पवारांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने जाणार नाही.

ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी उलट मध्यस्थी करून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ करण्यासाठी व एसटी कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे काम केले. त्यामुळे एसटी कर्मचारी यात नसावा. हे मुद्दाम व जाणिवपूर्वक केलेले कृत्य आहे. शरद पवारांच्या घरी गेलेले एसटी कर्मचारी होते का? प्रसारमाध्यमांनी मागण्या विचारल्या तर त्यांना धड मागण्याही सांगता येत नव्हत्या. या प्रकरणाची चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT