Sharad Pawar, Jayanat Patil, Samarjitsinh Ghadge , Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News : वस्तादाने एक डाव शिल्लक ठेवला होता; मुश्रीफांच्या बालेकिल्यामध्ये जाऊन जयंत पाटलांचा इशारा

Rahul Gadkar

Kohlapur News : गेली वर्षभर माझ्या डोक्यात असणारी चिंता आज मिटली. शाहू-फुले-आंबेडकर विचाराला सोडून गेल्यावर त्यांच्या विचारांची माणसे एकवटतात कसे हे लोकसभेला पहिले आहे. आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा हेच दाखवायचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मला समरजित घाटगे यांचा फोन आल्यावर सांगितले की, तुम्हीच येऊन कार्यकर्त्यांशी संवाद करा. त्यानंतर आम्ही टप्यात आल्यावर लगेच कार्यक्रम करतो. शरद पवारांनी कार्यकर्त्यांचा नेता केला, पण नेत्यांनी पवारांची साथ सोडली. पण लक्षात ठेवा वस्तादाने एक डाव नेहमी ठेवला असतो, असे सांगत साथ सोडून जाणाऱ्या नेत्यांना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी इशारा दिला. (Jayant Patil News)

तुतारी चिन्हावर कागलमधून घाटगे यांना तिकीट द्यावे का? असा सवाल जयंत पाटलांनी यावेळी कार्यकर्त्याना विचारला. यावेळी कार्यकर्त्यांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उमेदवारी घोषित मी करू शकत नाही. लवकरच पक्षप्रवेश होईल, त्यानंतर स्वतः शरद पवार पक्षप्रवेश करायला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समरजित घाटगे यांच्या शरद पवार (Sharad Pawar) गटातील प्रवेशामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील चित्र बदलणार आहे. पुरोगामी विचार पुसण्याचा प्रयत्न होता, पण लोकसभेला शाहू महाराजांचा विजय झाला, विचार टिकून राहिला. आता तोच विचार कागलमध्ये घाटगे यांच्या बाबतीत करायचे आहे. संपूर्ण महाराष्ट्र सरकारवर रोष व्यक्त होत आहे. आया-बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पाटील म्हणाले.

कागलमध्ये 3 सप्टेंबरला होणार घाटगेंचा पक्षप्रवेश

3 सप्टेंबरला कागलच्या गैबी चौकात समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. यावेळेस ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. ही सभा ऐतिहासिक करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT