Satyajeet Kadam and Jayashree Jadhav  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर उत्तरमध्ये संपत्तीत काँग्रेसच्या जाधवांनी भाजपच्या कदमांना टाकलं मागे

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

नागपूर : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. काँग्रेसकडून जयश्री जाधव (Jayashree Jadhav) तर भाजपकडून सत्यजित कदम (Satyajeet Kadam) मैदानात उतरले आहेत. दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले असून, संपत्तीचा तपशीलही जाहीर केला आहे. हे दोन्ही उमेदवार कोट्याधीश असल्याचे समोर आले आहे. जयश्री जाधवांकडे 86 कोटींची तर सत्यजित कदमांकडे 21 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. संपत्तीच्या बाबतीत जाधवांनी कदमांना मागे टाकल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर उत्तरची लढत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली आहे. येथून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव मैदानात उतरल्या आहेत. जाधव यांच्याकडे 86 कोटी 23 लाख 35 हजार रुपयांची मालमत्ता असून, 22 कोटी 63 लाखांचे कर्ज आहे. चंद्रकांत जाधवांच्या मृत्यूनंतर त्यांची सगळी मालमत्ता जयश्री जाधव यांच्या नावावर झाली आहे.

जाधव यांच्याकडे 1 लाख 55 हजार 680 रुपयांची रोकड असून, बँकेत 1 कोटी 23 लाख 41 हजार 965 रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांची शेअरमधील गुंतवणूक 1 लाख 79 हजार 500 रुपये असून, राष्ट्रीय बचत योजनेत 28 लाख 36 हजारांची गुंतवणूक आहे. जाधव इंडस्ट्रीजसह इतर कंपन्यांत त्यांची 31 कोटी 4 लाख 98 हजार 416 रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे दोन आलिशान कारसह 12 वाहने आहेत. तसेच, 57 लाखांचे सोन्याचे दागिने आहेत. त्यांच्यावर 22 कोटी 63 लाखांचे कर्जही आहे.

भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्याकडे 4 लाख 22 हजारांचा रोकड असून, बँकेत 61 लाख 16 हजारांच्या ठेवी आहे. त्यांची एकूण गुंतवणूक 2 कोटी 98 लाखांची आहे. त्यांच्याकडे सव्वा पाच लाखांचे सोन्याचे दागिने आहेत. शेअर आणि म्युच्युअल फंडमध्ये त्यांची 10 लाख 75 हजारांची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे शेती, भूखंड, फ्लॅट, इमारती व भागीदार असलेल्या कंपन्या अशी 17 कोटी 55 लाखांची मालमत्ता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT