कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा ( Karuna Sharma) यांनी राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी कोल्हापूर (Kolhapur) उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर त्यांनी लवकरच आपल्या प्रेमकहाणीवरील पुस्तक येणार असल्याचा बॉम्ब टाकला आहे. हे पुस्तक अंतिम टप्प्यात असून, त्यात अनेक पुरावेही असतील, असेही त्यांनी स्पष्ट करीत एकप्रकारे धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. (Karuna Sharma News)
करुणा शर्मा यांनी शिवशक्ती पक्ष स्थापन केला आहे. पक्षाच्या माध्यमातून आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व निवडणुका लढवण्याचे त्यांनी जाहीर केले होते. याची सुरवात कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतून झाली आहे. शर्मा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शर्मा यांच्या उमेदवारीची फार मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर करुणा शर्मा यांनी थेट धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे. (Karuna Sharma on Dhananjay munde News)
धनंजय मुंडेंना सहा-सहा मुले असून, अनेक पत्नी लपवल्याचा आरोप करुणा शर्मांनी केला होता. आमच्या दोघांच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यास तो हिट होईल, असेही त्या म्हणाल्या होत्या. आज अर्ज भरल्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या की, आमच्या प्रेमकहाणीवरील पुस्तक अंतिम टप्प्यात आहे. या पुस्तकातून मी अनेक पुरावे समोर आणणार आहे. या पुस्तकात आमची 25 वर्षांची कहाणी असेल. या पुस्तकात पुराव्यांसोबत आमच्या लग्नाचे फोटोही असतील. हे पुस्तक हिंदी भाषेत लिहून झाले असून, ते हिंदीसोबत मराठी भाषेतही असेल.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. आता त्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. कोल्हापूर उत्तरमधील पोटनिवडणुकीत करूणा शर्मा याच त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. मागील काही दिवसांपासून पक्षातर्फे कोण उमेदवार असणार आहे, यावर विचार सुरू होता. अखेरीस करूणा शर्मा यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष स्थापन केल्यानंतर त्या थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.