Rajan Patil And Yashwant Mane Join BJP .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur BJP: जयकुमार गोरेंचा पवारांना 'दे धक्का! मोहोळ, माढ्यातलं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी; भाजपमध्ये पाऊल ठेवताच राजन पाटलांचं मोठं विधान

Rajan Patil And Yashwant Mane Join BJP : मोहोळ, माढा या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद उभी केलेल्या नेत्यांचा भाजप पक्षप्रवेश शरद पवारांच्या राजकारणालाच मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा धमाका केला आहे. मोहोळ,माढा तालुक्यातलं ऑपरेशन लोटस यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. या निमित्तानं पालकमंत्री जयकुमार गोरेंनी (Jaykumar Gore) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचीही चर्चा आहे. मोहोळ,माढा या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद उभी केलेल्या नेत्यांचा भाजप पक्षप्रवेश शरद पवारांच्या राजकारणालाच मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन माजी आमदार आणि एका माजी आमदाराच्या दोन पुत्रांसह तब्बल 28 जणांचा बुधवारी (ता. 29 ऑक्टोबर) भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील त्यांचे दोन्ही पुत्र विक्रांत व अजिंक्यराणा पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार बबनराव शिंदे यांचे दोन्ही पुत्र रणजितसिंह शिंदे व विक्रमसिंह शिंदे यांच्यासह गोरे यांच्या मान खटाव मतदारसंघातीलही काही जणांनी कमळ हाती घेतलं.यामुळे शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मोठी ताकद वाढली आहे.

एकट्या मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे दीड हजार नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे 367 वाहनांतून मुंबईकडे रवाना झाले होते. दरम्यान, मुंबईतील भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यालयातील पक्षप्रवेशाच्या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भाजपत प्रवेश केलेल्या नेत्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोरच मोठं विधान केलं. ते म्हणाले,आम्ही निष्ठेनं राहणारी माणसं आहोत, सत्तेसाठी संधी साधून पक्ष बदल करणारा आमचा वारसा नाही,विचार नाही.राजकीय वाटचाल नाहीये. म्हणून मी गेली 40 वर्षे मी ज्या पक्षात राहिलो.कुठल्याही सत्तेची अपेक्षा न करता राहिल्याचंही त्यांनी सांगितलं.

पाटील म्हणाले,आता येथून पुढे भाजपात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवाभाऊंच्या नेतृत्व कसं भक्कम होईल, भारतीय जनता पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल,हे मी आणि माझे कार्यकर्ते भाजपचा झेंडा घेऊन,रात्रीचा दिवस करुन,या जिल्ह्यातल्या लोकांचं मतपरिवर्तन करुन यापुढे ज्या ज्या निवडणुका होतील, त्यात एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावेल, असा शब्दही राजन पाटील यांनी यावेळी दिला.

आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाही आहोत,शरीरात रक्ताचा थेंब आहे,तोपर्यंत आम्ही कमळ हाती घेऊन पक्षाचं काम करत राहू, अशी ग्वाही राजन पाटील यांनी यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील,यशवंत माने आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या दोन पुत्रांसह तब्बल 28 जणांचा भारतीय जनता पक्षात मुंबईत प्रवेश झाला.एकट्या मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे दीड हजार नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे 367 वाहनांतून मुंबईकडे रवाना झाले होते.

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील,यशवंत माने यांच्या प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघातील भाजप नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यांनी या प्रवेशाचे स्वागत केले. मात्र,यामुळे जुन्या भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती त्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना केली.त्याबाबत दक्षता घेतली जाईल; कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना दिली.यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे, सुशील क्षीरसागर,अंकुश अवताडे उपस्थित होते.

'या' नेत्यांनी घेतलं कमळ हाती

राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक माळी, जिल्हा कार्याध्यक्ष अस्लम चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक भारत सुतकर, बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे, उपसभापती प्रशांत बचुटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जालिंदर लांडे, सज्जन पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, ॲड. राजाभाऊ पाटील, कुंदन धोत्रे, माजी सभापती रत्नमाला पोतदार, ज्योत्स्ना पाटील, सिंधू वाघमारे, यशोदा कांबळे, राहुल मोरे, बाळासाहेब भोसले, विश्‍वजित पाटील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT