

Maharashtra Government : महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलण्याच्या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्राला 2047 पर्यंत विकसित करण्यासंदर्भात नागरिकांची मते, अभिप्राय आणि प्राधान्यक्रम जाणून घेण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या मदतीने राज्यव्यापी सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाच्या आधारे हे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील ‘व्हिजन मॅनेजमेंट युनिट’ या डॉक्युमेंटची अंमलबजावणी करणार आहे.
केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवापर्यंत भारताला 2047 पर्यंत विकसित करण्याचा संकल्प केला आहे. आगामी काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचेही उद्दिष्ट आहे. त्यानुसार महाराष्ट्रानेही 2047 पर्यंत ‘विकसित महाराष्ट्र-विकसित भारत’ हे ध्येय निश्चित केले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षी महाराष्ट्राला देखील पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट आहे. विकसित महाराष्ट्राची ही संकल्पना मूर्त स्वरूपात मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती व मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमानंतर 150 दिवसांचा सुधारणा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये आता विकसित महाराष्ट्र-2047 व्हिजन डॉक्युमेंटचा समावेश करण्यात आला आहे. हे व्हिजन डॉक्युमेंट 2 ऑक्टोबर 209चे अल्पकालीन व्हिजन (वार्षिक लक्ष्यांसह), 1 मे 2035 चे मध्यमकालीन व्हिजन (महाराष्ट्र@75) आणि 15 ऑगस्ट 2047 चे दीर्घकालीन व्हिजन (भारत@100) अशा तीन टप्प्यांत तयार करण्यात आले आहे.
या व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा तयार करण्यासाठी कृषी, उद्योग, सेवा, पर्यटन, नगर विकास, ऊर्जा आणि शाश्वत विकास, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि कौशल्य विकास, आरोग्य, समाज कल्याण, सॉफ्ट पॉवर, शासन, तंत्रज्ञान, सुरक्षा, वित्त असे १६ क्षेत्रीय गट स्थापन करण्यात आले. हे 16 गट प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार प्रकारांमध्ये विभागले आहेत. ज्यामध्ये सुमारे 100 उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.